
कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. त्यामुळे अनेक चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाले नाहीत.
मुंबई - कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. त्यामुळे अनेक चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाले नाहीत. अजय देवगनच्या 'मैदान' या चित्रपटाचे देखील शूटिंग थांबले होते. या चित्रपटाचे 65 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाचं 14 फेब्रुवारी पासून पवई येथे पुन्हा शूटिंग सुरू होणार आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
चित्रपटात काम करणाऱ्या खेळाडूंचे फुटबॉल प्रशिक्षण आणि कोरिओग्राफी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. अजय देवगण 14 फेब्रुवारी पासून शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. ते आटोपल्यानंतर पु्न्हा 10 मार्च रोजी मध इथं पुन्हा संघात सहभागी होईल. तिथ फूटबॉलशी संबंधित काही सीन शूट केले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शूटिंगच्यावेळी चित्रपटाची टीम सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊनच शूट करत आहे.
मैदान हा चित्रपट भारतीय फूटबॅल प्रशिक्षक अब्दुल रहिम यांच्या जिवनावर आधारित आहे. अब्दुल रहिम यांनी भारताच्या फुटबॅाल संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले होते. अजय देवगण या चित्रपटामध्ये अब्दुल रहिम यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हे वाचा - नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांना मिळणार महिला दिनाची भेट
अमित रविंद्रनाथ शर्मा हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. बोनी कपूर, अकाश चावला, अरूनवा जोय सेन गुप्ता आणि झी स्टुडिओ यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 15 ऑक्टोबर 2021 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपटाच्या स्पेशल ईफेक्टवरसुद्धा काम सुरु झाले आहे. पोस्टर रिलीज झाले असून यामध्ये अजयचा हटके लूक दिसत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.