अजय देवगणने केली आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; मात्र चित्रपट कोणता?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 जुलै 2020

आता अजयच्या मैदान या चित्रपटाबद्दल अनेकांना आता उत्सुकता लागलेली आहे. हा चित्रपट फुटबॉल खेळावर आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम यांनी 1950 ते 1963 मध्ये भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा 'तानाजी....द अनसंग वॉरियर' हा शंभरावा चित्रपट होता. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. काही राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त झाला. त्यानंतर अजयचा 'भुज...द प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल असे वाटलेले होते. पण हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

बापरे! विक्रोळीत कन्नमवारनगर बेस्ट चौकीत शिरले पाणी; वाहक - चालकांचे होतायत हाल.. 

आता अजयच्या मैदान या चित्रपटाबद्दल अनेकांना आता उत्सुकता लागलेली आहे. हा चित्रपट फुटबॉल खेळावर आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम यांनी 1950 ते 1963 मध्ये भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यांचा एकूणच प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. त्यांची व्यक्तिरेखा अजय या चित्रपटात साकारीत आहे. 

पिवळ्या बेडकांची वसईत डराव डराव; लॉकडाऊनमध्येही भरली अनोखी शाळा...

या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. प्रॉडक्शन हाऊसने जवळपास तारीख निश्चित केलीच होती. परंतु कोरोनामुळे थिएटर्स कधी उघडतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आता हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजय देवगणने याबाबतची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स त्याने सोशल मीडियावर टाकले आहे आणि पुढील वर्षी 13 ऑगस्ट 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात अजयबरोबरच प्रियमणी, गजराज राव, आकाश चावला आदी कलाकारही काम करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay devgn decalres the date of his next film, read full story