esakal | 'सिंघम'कडून महापालिकेला मदत; दादरमध्ये उभारणार ऑक्सिजन बेड्सचं कोव्हिड सेंटर

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn
'सिंघम'कडून महापालिकेला मदत; दादरमध्ये उभारणार ऑक्सिजन बेड्सचं कोव्हिड सेंटर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. बऱ्याच रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि वैद्यकिय सुविधांची कमतरता जाणवत आहे. या सर्व समस्यांना सामोरे जाऊन समाजातील ‘रियल हिरो’ म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स जोमाने काम करत आहे. बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणने आता कोरोना रूग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अजयने धारावीमध्ये व्हेंटिलेटर दिले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहता अजयने आणि बॉलिवूडमधील काही कलाकरांनी मुंबई महापालिकेसाठी दादरच्या शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईडच्या हॉलमध्ये एक इमर्जन्सी युनिट स्थापन केले आहे.

भारत स्काऊट आणि गाईडच्या या हॉलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० बेड लावले आहेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि पॅरा मॉनिटर्स या वैद्यकिय सुविधा देखील येथे आहेत. अजयसोबत दिग्दर्शक आनंद पंडित, बोनी कपूर, लव रंजन, रजनीश खनूजा, लीना यादव आणि आशिम बजाजा, समीर नायर, दीपक धर , ऋषी नेगी, तरुण राठी आणि आरपी यादव यांच्या मदतीने एक कोटी रुपयांचा निधी उभारून या हॉलमधील सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत.

हेही वाचा : 'अरे हाड.. आम्ही प्रश्न विचारणार'; आस्ताद काळेचा सरकारवर हल्लाबोल

कोरोनाच्या या कठिण काळात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सरकारला मदत केली आहे. अभिनेत्री विद्या बालनने कोरोना वारियर्सना 1000 पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किट डोनेट केले. काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' तर्फे 5 हजार फ्रंटलाईन वर्कर्ससाठी नाश्ता दिला. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असताना या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मदत कार्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.