Maidan Poster : 'तानाजी'नंतर आता अजय 'मैदान' गाजवायला सज्ज!

टीम ईसकाळ
Thursday, 30 January 2020

तिसऱ्या आठवड्यातही तानाजी चित्रपटाची जादू कमी होत नाही तोच आता पुन्हा एकदा अजय देवगण 'मैदान' गाजवायला सज्ज आहे... पण हे 'मैदान' लढाईचे नाहीये, तर मग कशाचं आहे? चला बघू...

'तानाजी : द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला आहे. अजय देवगणने साकारलेल्या पराक्रमी, शूर नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेमुळे त्यांचे शौर्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. तिसऱ्या आठवड्यातही तानाजी चित्रपटाची जादू कमी होत नाही तोच आता पुन्हा एकदा अजय देवगण 'मैदान' गाजवायला सज्ज आहे... पण हे 'मैदान' लढाईचे नाहीये, तर मग कशाचं आहे? चला बघू...

'तानाजी'चे द्विशतक; दोन आठवड्यांत कमाईचे रेकॉर्ड

अजय देवगणने आज सोशल मीडियावर त्याचा अगामी चित्रपट 'मैदान'चं पोस्टर शेअर केलंय. चिखलाने माखलेल्या मैदानात हातात बॅग व छत्री घेऊन फूटबॉलला किक मारताना अजय देवगण एका कोचच्या भूमिकेत दिसतोय. या पोस्टरला त्याने 'बदलाव लाने के लिए अकेला भी काफी होता है' असे कॅप्शन दिलं आहे. तर 'मैदान'चं आळखी एक पोस्टर शेअर केलंय, यात अजय देवगणचा चेहरा व त्याखाली फूटबॉल टीम दिसतीय. या पोस्टरला त्याने 'ही गोष्ट भारतीय फूटबॉल संघाच्या सुवर्ण काळाची व त्यांच्या यशस्वी प्रशिक्षकाची आहे.' असे कॅप्शन दिले आहे. मैदानची ही दोन्ही पोस्टर्स अत्यंत प्रभावी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 

'मैदान'ची गोष्ट कोणाची?
मैदान चित्रपटात 1956 ते 1962 मधील भारतीय फुटबॉल संघ व त्यांचे प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांची गोष्ट साकारण्यात येणार आहे. 1956 मध्ये भारतीय फुटबॉल संघ मेलबर्नमध्ये ऑलिंपिकमध्ये पोहोचला होता. विशेष म्हणजे यावेळी भारतीय संघ सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता. तर 1963मध्ये एशियन गेम्समध्ये कॅन्सरशी लढा देत सैय्यद यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. या काळ हा भारतीय फुटबॉलसाठी सुवर्णकाळ होता, त्यानंतर इतके यश संघाने कधीच मिळवले नाही. अजय देवगण या चित्रपटात सैय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारताना दिसेल.

27 नोव्हेंबर 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Devgn shares his new movie Maidan Poster