'तानाजी'चे द्विशतक; दोन आठवड्यांत कमाईचे रेकॉर्ड

Tanhaji
Tanhaji

मुंबई : 'रा रा रा...रा' म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने 200 कोटींची कमाई केली असून, अजय देवगणने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. दोन आठवड्यांत या चित्रपटाने एवढी कमाई केली आहे.

या चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांत 107.68 कोटींची कमाई करत शंभर कोटींचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतरही हा चित्रपट सगळीकडे हाऊसफुल्ल सुरु होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाना या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आलेला आहे. आता या चित्रपटाने या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून विक्रम केला आहे. तुमच्या प्रेमामुळेच चित्रपट चालत असून, तानाजीला यंदाच्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट बनविण्याबद्दल सर्वांचे आभार, असे अजय देवगणने ट्विट करत म्हटले आहे. त्याने यानिमित्त एक खास पोस्टरही प्रसिद्ध केले आहे.

शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. तसेच ओम राऊतने दिग्दर्शनाच्या बाबतीत सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तसेच काजोल-अजय यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर झळकली असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत. सैफ अली खानचा अभिनय प्रेक्षकांना आवडतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com