esakal | एजाजचा जामीन फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

actor ajaz khan

एजाजचा जामीन फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी अटकेत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेता एजाज खान याला (actor ajaz khan) गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक (mumbai police arrest) केली होती. त्याचे कारण म्हणजे त्याचा ड्रग्ज केसशी असलेला संबंध. यानंतर त्याच्यामागे पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा सुरु झाला. त्याच्या नावाची सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. अटकेनंतर त्यानं मुंबई न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयानं तो फेटाळला आहे. नारकोटिक्सच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली होती. (ajaz khan bail application rejected he arrested by ncb in a drugs case)

गेल्या वर्षी बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं (sushant singh rajput) त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. जेव्हा त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला होता. तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्या दरम्यान बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचाही समावेश होता. यावेळी बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावं समोर आली होती. अजूनही याप्रकरणाच्या मुळाशी पोलीस पोहचलेले नाहीत. तपासा दरम्यान काही नावं समोर आली आहेत. एजाज खान हे नाव त्यापैकी एक आहे.

सुरुवातीला शादाब बटाटाशी चौकशी करण्यात आली तेव्हा एजाजचे नाव समोर आले होते. पहिल्यांदा बटाटाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एंजन्सीनं एजाजलाही ताब्यात घेतले होते. आणि त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. एजाजला 31 मार्च रोजी मुंबई एयरपोर्टवरुन अटक करण्यात आली होती. त्यावेळी एनसीबीनं एजाजच्या घरांवर देखील छापे टाकले होते. त्या सर्च ऑपरेशनमध्ये चार झोपेच्या गोळ्या सापडल्या होत्या. त्यावर एजाजनं आपली बाजु मांडली होती.

हेही वाचा: "मुख्यमंत्र्यांनी राजू सापतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा"

हेही वाचा: दागिने, घरातील सामान विकण्याची अभिनेत्रीवर आली वेळ; सोनू सूदकडेही मागितली मदत

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाजनं असं सांगितलं की, माझ्या घरातून चार झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला आहे. ती त्या गोळ्यांचा उपयोग डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. एजाज हा मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता आहे. त्यानं बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये भाग घेतला होता. यापूर्वी देखील त्यानं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेयर केली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

loading image