
मराठमोळा अजिंक्य देव 'करिश्मा'सोबत, दिसणार वेगळ्या भूमिकेत
आज मनोरंजन क्षेत्राची चित्रपट, मालिका, वेबसिरिज , जाहिराती, इव्हेन्टस अशी चौफेर वाटचाल सुरु असून काही कलाकारही याच चौफेरपणे आपली कारकिर्द आखत आहेत. अजिंक्य देवचे(Ajinkya Deo) याबाबत आवर्जून नाव घ्यायला हवे. त्याची भूमिका असलेला 'झोलझाल ' हा मराठी चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे.

Ajinkya Deo with karisma kapoor and webseries team.(Brown)
शोमन निर्माते सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टसच्या वतीने निर्माण होत असलेल्या लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'माय डॅडस वेडिंग ' या मराठी चित्रपटातही अजिंक्य देवची महत्वाची भूमिका असून १७ जूनपासून या चित्रपटाचे लंडन येथे चित्रीकरण सुरु होत आहे. तर आपला भाऊ अभिनय देव याच्या दिग्दर्शनातील 'ब्राऊन ' या वेबसिरिजमध्ये अजिंक्य देव करिष्मा कपूरसोबत भूमिका साकारत आहे.
हेही वाचा: शिवसेना,कॉंग्रेस,आप अनेकांना इम्युनिटी वाढवायचा अग्निहोत्रींचा खोचक सल्ला
त्याशिवाय बिजाॅय नंबियार दिग्दर्शित 'काला ' या टी सिरीज निर्मित वेब सिरिजमध्येही अजिंक्य देवने भूमिका साकारली आहे. या वेबसिरिजचे बरेचसे चित्रीकरण कोलकाता येथे झाले आहे. आपल्या अशा चौफेर कामाचा आनंद घेत घेत अजिंक्य देव पुढे सरकतोय.
Web Title: Ajinkya Deo Busy In Filmwebseries Shooting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..