Akshay Kumar: दोगलापन! नकार देऊनही अक्षय कुमार पुन्हा शाहरुख - अजयसोबत दिसला पान मसालाच्या जाहीरातीत

अक्षय कुमार पुन्हा एकदा पान मसालाच्या जाहीरातीत दिसल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय
akshay kumar again in vimal ad with shah rukh khan and ajay devgn netizens angry on akshay
akshay kumar again in vimal ad with shah rukh khan and ajay devgn netizens angry on akshaySAKAL

Akshay Kumar in Vimal Ad: अक्षय कुमार हा मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेता. अक्षय कुमारला सध्या मिशन रानीगंज सिनेमा रिलिज झालाय. त्यामुळे अक्षयवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण कौतुकाच्या वर्षावात अक्षय कुमारवर पुन्हा एकदा टिकेची झोड उठली आहे.

अक्षय कुमारने काही महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर फॅन्सची माफी मागून विमल पान मसालाची जाहीरात करणार नाही असं सांगितलं होतं. पण आता अक्षय विमलच्या नवीन जाहीरातीत दिसल्याने त्याला लोकांनी चांगलंच ट्रोल केलंय.

akshay kumar again in vimal ad with shah rukh khan and ajay devgn netizens angry on akshay
Shahrukh Khan : शाहरूख खानला धोका? मिळाली Y+ सिक्युरिटी; काय आहे कारण

अक्षय कुमार विमलच्या नवीन जाहीरातीत

विमलच्या जाहिरातीची सुरुवात शाहरुख आणि अजय यांच्या एन्ट्रीने होते. हे दोघे अक्षयच्या घराजवळ त्याची वाट पाहत होते. मात्र, अक्षय हेडफोनवर संगीत ऐकण्यात मग्न असचो. अजय हॉर्न वाजवत असतो. मग शेवटी शाहरुख त्याच्या काचेच्या खिडकीकडे बॉल टाकून अक्षयचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र बॉल शेजारी असलेल्या सौंदर्याच्या खिडकीवर आदळतो.

सौंदर्या तिच्या खिडकीतवर पडलेला क्रॅकवर चिडून बाल्कनीत उभी असताना, घाबरलेला शाहरुख अजय देवगणकडे बोट दाखवत त्याला दोष देतो. वैतागलेला अजय मग विमलचे पॅकेट उघडतो, ते खातो आणि अक्षयच्या खिडकीकडे बोट दाखवतो.

विमलच्या सुगंधाने अक्षय खिडकीपाशी येतो आणि अजय त्याला खाली यायला सांगतो. आणि मग शेवटी तिघेही ब्रँडची सिग्नेचर स्टेप करतात.

नेटकऱ्यांनी अक्षयला पाहताच केली टिका

अक्षय कुमार पान मसाला जाहिरात करणार नाही असं म्हणाला होता. कारण जेव्हा त्याने विमलची पहिली जाहिरात केली तेव्हा त्याच्या चाहत्यांना आनंद झाला नव्हता. मग त्याने पुन्हा असे का केले? असा सवाल नेटकरी त्याला करत आहेत. एका कमेंटमध्ये लिहिले होते, "अक्षय कुमार विमल जाहिरात करणार नव्हता, मग काय झाले? हा काय निर्णय आहे?" "दु:खी, अस्वस्थ, अक्षय कुमार त्याच्या शब्दाला जागला नाही," असे आणखी एका इंस्टाग्राम युजरने लिहिले. अशाप्रकारे नेटकरी अक्षयवर नाराजी व्यक्त करत आहेत.

अक्षयने याआधी मागितली माफी

या वर्षाच्या सुरुवातीला, विमलच्या जाहीरातीत सामील झाल्यानंतर अक्षयला नाराजीचा सामना करावा लागला. विमलच्या जाहीरातीत काम केल्याने एप्रिल महिन्यात इंस्टाग्रामवर अक्षयने आपल्या चाहत्यांची माफी मागितली होती. "मला माफ करा. मी तुमची, माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियेचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणार नाही, पण विमल इलायची यांच्याशी असलेल्या माझ्या सहवासाच्या प्रकाशात तुमच्या भावना व्यक्त केल्याचा मी आदर करतो,” त्यांनी लिहिले होते.

आता माफी मागूनही अक्षय कुमार पुन्हा विमलच्या जाहीरातीत दिसल्याने नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com