Shahrukh Khan : शाहरूख खानला धोका? मिळाली Y+ सिक्युरिटी; काय आहे कारण

shahrukh khan twits on yesterdays defeat
shahrukh khan twits on yesterdays defeat sakal

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. शाहरुख खानला 'पठाण' या चित्रपटादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. यावर्षी 'जवान' आणि 'पठान' अशा दोन हिट चित्रपटानंतर शाहरूख खानला असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय?

याआधी दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा शाहरुख खानला पुरवण्यात आलेली होती. त्याशिवाय स्वत:चा सुरक्षा रक्षकही शाहरुख खानसोबत होता. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आलेली आहे.

shahrukh khan twits on yesterdays defeat
Mera Piya Ghar Aaya 2.0: कुठं माधुरी कुठं सनी, काय आहे का नाही? "मेरा पिया घर आया 2.0" वरुन सनीवर नेटकऱ्यांची आगपाखड

आता शाहरूख खानसोबत नेहमीच सहा पोलीस कमांडो त्याचे बॉडीगार्ड म्हणून असतील. सशस्त्र अंगरक्षक महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण युनिटचे असणार आहेत. संपूर्ण देशभरात शाहरूख खानला सुरक्षा दिली जाईल आणि या बॉडीगार्डकडे MP-5 मशीन गन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तूल असतील. शाहरुखच्या घरावरतीही चोवीस तास पहारा असणार आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी सलमान खानला देखील Y+ सुरक्षा देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता शाहरुखला देखील Y+ स्कॉट सुरक्षा देण्यात आली आहे.

shahrukh khan twits on yesterdays defeat
Nusrat Bharucha : अखेर अभिनेत्री नुसरत भरुचा मुंबईत पोहचली! चाहत्यांना मोठा दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com