'फिलहाल 2' च्या फेक कास्टिंगवर अक्षय भडकला, चाहत्यांना केलं सावध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

सध्या 'फिलहाल २'ची कास्टिंग होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहे. मात्र अक्षयने आता या बातम्या खोट्या असल्याचे सांगत प्रेक्षकांना सावध केले आहे.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री नुपूर सेनन यांचा 'फिलहाल' हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. 'फिलहाल' या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अक्षयने 'फिलहाल २' ची घोषणा केली होती. अशातच सध्या 'फिलहाल २'ची कास्टिंग होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहे. मात्र अक्षयने आता या बातम्या खोट्या असल्याचे सांगत प्रेक्षकांना सावध केले आहे. या म्युझिक व्हिडिओसाठी कोणतीही कास्टिंग होत नसल्याचे अक्षयने ट्विटरवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे . 

हे ही वाचा: सलमानचा मुंबई पोलिसांना मदतीचा हात, एक लाख सॅनिटायझरचं केलं मोफत वाटप

अक्षयने ट्विट करत याची माहिती दिली आहे. ट्विट करत तो म्हणाला की कोरोनाच्या काळात खोट्या बातम्या बऱ्याच ऐकल्या आहेत पण आता खोटी कास्टिंग देखील होत आहे. या संदर्भात त्याने नोटीस देखील काढली आहे.  ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'आम्हाला माहिती मिळाली की काही लोक 'फिलहाल २' च्या कास्टिंगबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. आम्ही फिलहालच्या टीमकडून सांगू इच्छितो की ना आम्ही ना आमच्या प्रॉडक्शन्स हाउसने, बॅनरने किंवा आमच्याशी जोडलेल्या कोणत्याही व्यक्तीने, एजन्सी, पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी या गाण्याच्या सिक्वेलची कास्टिंग करत नाही आहोत.'

यापुढे तो म्हणाला, 'आम्ही सध्या फिलहालच्या सिक्वेलसाठी कोणतीही कास्टिंग नाही करत आहोत. आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की फिलहालची कथा येईल तेही ओरिजनल कास्ट आणि टीमद्वारे आम्ही ती घेऊन येणारं आहोत. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि युजर्सला सांगू इच्छितो की खोटी कास्टिंगच्या फोन आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. फिलहालच्या पाहिल्या पार्टला जो प्रतिसाद मिळाला त्याने आम्ही 'फिलहाल पार्ट २' ला घेऊन येण्यास  फार उत्साही आहोत. सध्या आपण ज्या कठीण परिस्थितीत आहोत त्यासाठी बनवलेल्या नियमांचे आपण पालन करा. आम्ही लवकरच फिलहाल पार्ट २ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊ. ' 

फिलहाल या गाण्यात अक्षयने नुपूरसोबत पहिल्यांदाच काम केले होते. नुपूर ही बॉलिवूड अभिनेत्री क्रीती सेननची बहिण असून या म्युझिक व्हिडिओमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

akshay kumar alerts fan about fake casting of filhaal 2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar alerts fan about fake casting of filhaal 2