Kesari : इतिहासातील सर्वात कठीण युध्दाच्या कहाणीचा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

  • चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोपडा मुख्य भूमिकेत आहे. 
  • अनुराग सिंह चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.
  • हिरू यश जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपुर्वा मेहता, सुनीर खेतरपाल यांनी चित्रपटांची निर्मिती केली आहे. 

अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'केसरी' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. एका योध्दाची असलेली ही कहाणी आपल्या लोकांच्या हक्कासाठी आणि मायभूमीसाठी लढण्याची प्रेरणा देणारी आहे.

येत्या 21 मार्च ला 'केसरी' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा तीन मिनिटांचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. आपल्या देशासाठी लढणाऱ्या 21 शुरवीरांचा संघर्ष यात दाखविला आहे. अक्षय कुमार हवलदार सिंह यांच्या भूमिकेत दिसेल. ज्यांनी इंडो-ब्रिटिश आर्मीचे नेतृत्व केले होते. या ट्रेलरची सुरवात अक्षय कुमारच्या डायलॉगने होते. तो म्हणतो, 'एक गोरे ने मुझसे कहाँ था की, तुम गुलाम हो, हिंदुस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते है। आज जवाब देने का वक्त आ गया है।' 

1897 साली सारागढी येथील लढाईवर आधारीत चित्रपटाची कहाणी आहे. या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेचे 21 सीख तरुणांनी 10 हजार अफगानी सैनिकांशी युध्द केले होते. या युध्दाला इतिहासातील सर्वात कठीण युध्दांपैकी एक मानले जाते. चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोपडा मुख्य भूमिकेत आहे. अनुराग सिंह चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. हिरू यश जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपुर्वा मेहता, सुनीर खेतरपाल यांनी चित्रपटांची निर्मिती केली आहे. 

 

 

 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar and Parineeti Chopra starer Kesari film Official Trailer out today