दसऱ्यानिमित्त अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar movie gorkha

चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित

दसऱ्यानिमित्त अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार Akshay Kumar हा अष्टपैलू कलाकारांमध्ये गणला जातो. एका वर्षात तीन ते चार चित्रपट करण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. अॅक्शनसह कॉमेडी आणि गंभीर या सगळ्या प्रकारच्या चित्रपटात त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षयने आनंद एल रायच्या 'अतरंगी रे' आणि 'रक्षा बंधन' या चित्रपटाची घोषणा केली होती. आता दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर त्याने 'गोरखा' Gorkha या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंटचे महान अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरन सिंह चौहान करणार आहेत.

दसऱ्याच्या निमित्ताने अक्षयने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. त्याने चाहत्यांसोबत फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना लिहिले, 'कधीकधी कथा या इतक्या प्रेरणादायी असतात की त्या तुम्हाला पडद्यावर साकारव्याशा वाटतात. गोरखा - मेजर जनरल इयान कार्डोझो या महान योद्धाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. ही भूमिका आणि हा विशेष चित्रपट सादर करण्याचा सन्मान मला मिळताय.'

हेही वाचा: 'अनुपमा' फेम पारसने फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले इअरफोन्स; बॉक्स उघडताच..

चित्रपटाबाबत निर्माते आनंद एल राय म्हणाले, “मेजर जनरल इयान कार्डोझो यांची कथा पडद्यावर आणण्याचा सन्मान आम्हाला मिळत आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचं नाव इतिहासात लिहिले गेले आहे. अक्षयसोबत तिसऱ्यांदा काम करण्यासाठी मी उत्साहित आहे."

loading image
go to top