अक्षय कुमारने केला 'या' अभिनेत्रीचा मेकअप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मिशन मंगलच्या प्रमोशन दरम्यानचा अक्षयचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो एका अभिनेत्रीचा मेकअप करतोय.

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' काल (ता. 15) रिलीज झाला. त्यापूर्वी या चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन केले. मजा मस्तीही केली. त्याचा प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो एका अभिनेत्रीचा मेकअप करतोय.

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मेकअप आर्टिस्ट बनला आहे. अक्षय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या चेहऱ्यावर मेकअप करताना दिसत आहे. दरम्यान, अक्षय सोनाक्षीच्या नाकावर स्पंज जोरात दाबतो आणि त्यामुळे सोनाक्षी जोरात ओरडते. त्यानंतर सोनाक्षी मस्तीमध्ये अक्षयला मारते. अक्षयने केलेल्या मेकअपमुळे सोनाक्षीला कोणी ओळखणार नाही असे सोनाक्षी व्हिडीओमध्ये म्हणते. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जगनशक्ती केले असून हा चित्रपट नोव्हेंबर 2013 मध्ये इस्त्रोने केलेल्या मंगळयानाच्या प्रोजेक्टवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (किर्ती कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar Became Makeup Artist For Sonakshi Sinha