आयुषीसाठी 'बॉलीवूडचा खिलाडी' धावला! हार्ट ट्रान्सप्लांटसाठी दिला एवढा मोठा 'चेक' | Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar news

Akshay Kumar : आयुषीसाठी 'बॉलीवूडचा खिलाडी' धावला! हार्ट ट्रान्सप्लांटसाठी दिला एवढा मोठा 'चेक'

Akshay Kumar Bollywood Actor help to ayushi 15 lakh : बॉलीवूडचा अक्षय कुमार हा त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याला नेटकऱ्यांकडून ट्रोलही केले जाते. मात्र आता अक्षय कुमार एका वेगळ्या कारणासाठी नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय ठरतो आहे. त्यानं जे काही केलं आहे त्यामुळे चाहत्यांनी त्याचे आभार मानले आहे.

दिल्लीत राहणाऱ्या आयुषीच्या हार्ट ट्रान्सप्लांटसाठी बॉलीवूडचा खिलाडी धावून आला आहे. त्यानं आयुषीच्या कुटूंबियांना केलेली मदत महत्वाची ठरली आहे. सोशल मीडियावर जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हापासून अक्षयवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयनं आयुषीच्या हार्ट ट्रान्सप्लांटसाठी १५ लाख रुपये दिले आहेत. आयुषीच्या कुटूंबियांनी त्याचे आभार मानले आहेत. ई टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, आयुषीचे आजोबा योगेंद्र अरूण यांनी आपल्याला अक्षयला भेटण्याची इच्छा दर्शवली आहे. सम्राट पृथ्वीराजचे दिग्दर्शक डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी अक्षयला आयुषविषयी माहिती दिली होती.

Also Read - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

याविषयी अधिक माहिती देताना योगेंद्र अरुण यांनी सांगितलं की, माझी नात आयुषी ही जेव्हा जन्माला आली तेव्हा पासून तिला हदयाचा आजार जडला होता. आता ती २५ वर्षांची होती. तिचे केवळ २५ टक्के हदय काम करत आहे. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता आपल्याकडे फक्त हार्ट ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय आहे. मात्र अक्षयच्या मदतीनं आमचे सारे प्रश्न सुटले आहे. आम्ही आता डोनरच्या शोधात आहोत.

हेही वाचा: Ved Movie Record: वेडनं केलं 'सैराट'... पब्लिक नुसतं झिंग झिंग झिंगाट...

आयुषीच्या आजोबांनी सांगितलं की, ते ८२ वर्षांचे आहे. आणि ते निवृत्त प्राचार्य आहेत. आयुषीचा खर्च ५० लाख असून त्यासाठी ते पैसे जमवत आहेत. अक्षयनं त्यांना मदतीचे आश्वासन केले होते. आणि यापुढील काळात देखील अशी मदत करु असेही त्याच्याकडून सांगण्यात आले होते. अक्षयच्या या मदतीनं आयुषीच्या कुटूंबियांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: The Kashmir Files : आता फक्त ऑस्करची प्रतिक्षा! 'काश्मीर फाईल्स' शॉर्टलिस्ट, दिग्दर्शक अग्निहोत्रींची कडक पोस्ट

अक्षयच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तो इमरान हाश्मीसोबत सेल्फी नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय त्यानं सोराराई पोटरुचा रिमेक तयार केला आहे. त्याचे शुटींगही पूर्ण झाले आहे. यापूर्वी तो ओ माय गॉड २ चे शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले होते.