अक्षयकडे नाही वेळ... 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

दिग्दर्शक प्रियदर्शन परत एकदा आपला आणखी एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. मल्याळम्‌ चित्रपट "ओप्पम' या चित्रपटाचा हिंदी रिमेक ते करणार आहे. खरं तर या चित्रपटासाठी अक्षयकुमारला विचारण्यात आलं होतं. पण अक्षयकुमार त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये इतका गुंतला आहे, की त्याला हा चित्रपट करायला वेळच नाही. मग काय; प्रियदर्शन सरळ अजय देवगणकडे गेला. बघायला गेलं तर अजयचेही आगामी "सन ऑफ सरदार 2', "सिंघम 3', "गोलमाल 4', "बादशाहो', "लव रंजन' आणि रेमो डिसुजाचा चित्रपट एवढे चित्रपट सुरू आहेत. पण अजयने या चित्रपटासाठी प्रियदर्शनला हो म्हटले आणि अक्षयचा पत्ता कट झाला.

दिग्दर्शक प्रियदर्शन परत एकदा आपला आणखी एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. मल्याळम्‌ चित्रपट "ओप्पम' या चित्रपटाचा हिंदी रिमेक ते करणार आहे. खरं तर या चित्रपटासाठी अक्षयकुमारला विचारण्यात आलं होतं. पण अक्षयकुमार त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये इतका गुंतला आहे, की त्याला हा चित्रपट करायला वेळच नाही. मग काय; प्रियदर्शन सरळ अजय देवगणकडे गेला. बघायला गेलं तर अजयचेही आगामी "सन ऑफ सरदार 2', "सिंघम 3', "गोलमाल 4', "बादशाहो', "लव रंजन' आणि रेमो डिसुजाचा चित्रपट एवढे चित्रपट सुरू आहेत. पण अजयने या चित्रपटासाठी प्रियदर्शनला हो म्हटले आणि अक्षयचा पत्ता कट झाला. याआधी अजयने प्रियदर्शनबरोबर "आक्रोश' आणि "तेज' हे चित्रपट केले आहेत. पण प्रियदर्शनच्या मनात अजयबरोबर एक तरी हिट चित्रपट बनवावा असं आहे. त्यामुळे प्रियदर्शनची ही इच्छा पूर्ण होते का, ते येत्या काही महिन्यांत कळेलच. 

Web Title: Akshay kumar busy Man