
कोरोनामुळे चित्रपटगृहे आणि चित्रीकरण बंद आहे. भारतातील चित्रपटगृहाचा पडदा कधी उघडेल हे सांगता येत नाही. मात्र जगातील काही ठिकाणी थिएटर्स सुरू आहेत.
मुंबई ः कोरोनामुळे चित्रपटगृहे आणि चित्रीकरण बंद आहे. भारतातील चित्रपटगृहाचा पडदा कधी उघडेल हे सांगता येत नाही. मात्र जगातील काही ठिकाणी थिएटर्स सुरू आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणची थिएटर्स सुरू आहेत आणि तेथे चित्रपट दाखविले जात आहेत. दुबईत काही ठिकाणी थिएटर्स सुरू आहेत. पण नेमका कोणता चित्रपट दाखवावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.
वाचा ः मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात
कारण भारतात लॉकडाऊन असल्याने कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे आता दुबईतील थिएटर्समध्ये अक्षय कुमार, करिना कपूर खान आणि दिलजित दोसांज यंचा 'गुड न्यूज' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला होता. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. राज मेहताने तो दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता.
वाचा ः धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...
आता दुबईत आता तो 11 जूनला पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. याबद्दल अक्षय कुमार म्हणाला, की दुबईने माझ्या चित्रपटांवर नेहमीच प्रेम केले आहे आणि आता अशा निराशादायक वातावरणात माझा चित्रपट तेथील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करील अशी आशा आहे.