अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोना, कान्स चित्रपट मोहत्सवाला मुकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar gets second time  corona infection will not be seen at cannes film festival

अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोना, कान्स चित्रपट मोहत्सवाला मुकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे तो कान्स चित्रपट महोत्सावात मुकणार आहे . अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

तो कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाणार होता, कोरोनामुळे आता त्याला जाता येणार नाही. ए आर रहमान, शेखर कपूर, पूजा हेगडे आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार होता. अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, तो खूप उत्सुक होता. सध्या तो विश्रांती घेणार आहे. त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: "सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर

कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 मेपासून सुरू होणार आहे. अक्षय म्हणाला, “कान्स 2022 मध्ये आमच्या सिनेमाची वाट पाहत होता. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली हे दुःखद आहे. मी आता आराम करेन अनुराग ठाकूर आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. खरंच मला तुझी खूप आठवण येईल.'अक्षयला कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा: मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करू : उद्धव ठाकरे

Web Title: Akshay Kumar Gets Second Time Corona Infection Will Not Be Seen At Cannes Film Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :akshay kumar
go to top