'असा वाढदिवस कधीच आवडला नसता पण..'; अक्षय कुमारची पोस्ट

अक्षयच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आई अरुणा भाटिया यांचं निधन
'असा वाढदिवस कधीच आवडला नसता पण..'; अक्षय कुमारची पोस्ट

अभिनेता अक्षय कुमारच्या Akshay Kumar आईचे बुधवारी (८ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (९ सप्टेंबर) अक्षयचा वाढदिवस असून त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. आईसोबतचा एक फोटोसुद्धा त्याने शेअर केला आहे. 'असा वाढदिवस कधीच आवडला नसता पण मला खात्री आहे की आई मला वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असणार. तुम्हा प्रत्येकाच्या सहानुभूती आणि शुभेच्छांसाठी आभार. आयुष्य चालत राहतं', असं त्याने लिहिलं आहे.

अरुणा भाटिया Aruna Bhatia या ७७ वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आईला आयसीयूमध्ये दाखल केल्याचं समजताच अक्षय युकेहून मुंबईला तातडीने परतला. आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो युकेला गेला होता.

'असा वाढदिवस कधीच आवडला नसता पण..'; अक्षय कुमारची पोस्ट
वर्षभरात अक्षय कुमार कमावतो इतकी मोठी रक्कम

आईच्या निधनानंतर अक्षयची पोस्ट-

'ती माझं सर्वस्व होती आणि आज तिच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. माझी आई अरुणा भाटियाने आज सकाळी हे जग सोडलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो', अशी पोस्ट अक्षयने लिहिली आहे.

२०१५ मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय आईसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाला होता. "आई आणि तिच्या मुलाचे बंधन मजबूत असले तरी ते तितकेच नाजूक असते. आम्हा दोघांमध्ये कोणतीच गोष्ट येऊ शकत नाही. आमच्यात कितीही मैलांचं अंतर असलं, दररोज संपर्कात राहू शकलो नसलो तरी तिच्याशिवाय माझं अस्तित्व काहीच नाही, मी कोणीही नाही", असं तो म्हणाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com