'राम सेतू' च्या पोस्टरवर मोठी चूक; अक्षय पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

'राम सेतू' च्या पोस्टरवर मोठी चूक; अक्षय पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) गेल्या काही दिवसांत अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. अक्षय कधी तंबाखू ब्रॅन्डच्या जाहिरातीसाठी ट्रोल होताना दिसतोय तर कधी त्याच्या सिनेमाच्या पोस्टरमुळे. आता हे नवीन सिनेमाच्या पोस्टरवरुन ट्रोल होण्याचं काय कारण आहे? चला जाणून घेऊया.

हेही वाचा: 'करिअर संपलंय त्या कळलाव्याचं'; कंगनानं पुन्हा साधला करण जोहरवर निशाणा

अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या आगामी 'रामसेतू' सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिसही आणखी एका सिनेमातील कलाकारासोबत दिसत आहे. रामसेतू च्या या पोस्टरवर अक्षय कुमार हातात पेटती मशाल हातात घेऊन दिसत आहे. जॅकलिननेही आपल्या हातात टॉर्च पकडली आहे. पोस्टर पाहिल्यावर वाटतं की ते सगळे कशाच्या तरी शोधात आहेत. पोस्टवर दिसणाऱ्या सिनेमातील तिन्ही व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधण्याची प्रखर इच्छा दिसून येत आहे. पोस्टर जसा शेअर झाला तसा लगोलग व्हायरलही झाला.

आता एखादी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् ट्रोलर्सच्या त्यावर प्रतिक्रिया आल्या नाहीत तर नवलच म्हणावं लागेल. ट्रोलर्सला अक्षय कुमारच्या रामसेतू सिनेमाचं हे नवीन पोस्टर खटकलंय म्हणे. त्यांना या पोस्टरमधलं लॉजिक कळलं नाही. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की अक्षयनं हातात मशाल पकडली आहे,तर दुसरीकडे जॅकलिनने हातात टॉर्च पकडला आहे. खरंतर अक्षयही तिच्यासारखं टॉर्च पकडू शकला असता. पण आता यामुळे लोकांनी सोशल मीडियावर पोस्टरची खिल्ली उडवायला सुरवात केली आहे. नेटकऱ्यानं लिहिलं आहे- ''जॅकलिन जवळ टॉर्च आहे मग अक्षय तिच्यासोबत मशाल हातात पकडून का चालला आहे''. हा फोटो दिग्दर्शनातल्या खूप छोट्या छोट्या चूकांकडे बोट दाखवतोय.

हेही वाचा: हिंदी भाषा वादात कंगनाची उडी; म्हणाली,'संस्कृतच हवी राष्ट्रीय भाषा कारण...'

दुसऱ्या एका नेटकऱ्यानं पोस्टरवर जोक मारताना म्हटलं आहे की,''बॉलीवूडमध्ये काहीही दाखवलं जाऊ शकतं. जसं इथे एकाच्या हातात मशाल तर दुसऱ्याच्या हातात टॉर्च दाखवला गेला आहे. ते देखील एकाच फ्रेममध्ये''. आणि चक्क 'RIP Logic' असं म्हटलं आहे. रामसेतु या वर्षी दिवाळीत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस,नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यानंतर अक्षय कुमारचा पृथ्वीराजही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा: 'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूरवर पाकिस्तानी गायिकेचं गाणं चोरल्याचा आरोप

आता पहायचं की जसं आता रामसेतु च्या पोस्टरवरील चूक दाखवून लोकं अक्षयला ट्रोल करीत आहेत तसं प्रदर्शनानंतर या सीनवरनं लोकं काय प्रतिक्रिया देतील.

Web Title: Akshay Kumar Ramsetu Movie Poster Trolled By

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top