IPS अधिकाऱ्याने सांगितली अक्षय कुमारच्या 'त्या' फोटोमधील चूक

अक्षयनेही सांगितलं फोटोमागचं सत्य
IPS अधिकाऱ्याने सांगितली अक्षय कुमारच्या 'त्या' फोटोमधील चूक

राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा आणि धार्मिक स्थळांपाठोपाठ चित्रपट आणि नाट्यगृहांचा पडदा २२ ऑक्टोबरपासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. या निर्णयानंतर अभिनेता अक्षय कुमारने Akshay Kumar सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. आगामी 'सूर्यवंशी' Sooryavanshi या चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने अक्षयच्या या फोटोमधील चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर अक्षयने त्यांना उत्तर दिलं आहे. या फोटोमध्ये अक्षयसोबत रणवीर सिंग, अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहेत.

फोटोमध्ये रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि अजय देवगण बाजूबाजूला उभे असून रणवीर डेस्कवर बसलेला दिसून येत आहे. चौघंही एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत. खऱ्या आयुष्यात वरिष्ठ पोलिसांसमोर इन्स्पेक्टर अशा पद्धतीने बसत नाहीत, असं आयपीएस अधिकाऱ्याने लक्षात आणून दिलं. 'इंस्पेक्टर साहेब बैठे है (तन कर) और एस पी साहब खडे, ऐसे नही होता है जनाब', असं ट्विट संबंधित अधिकाऱ्याने केलं. त्यावर अक्षयनेही त्यांना उत्तर दिलं.

IPS अधिकाऱ्याने सांगितली अक्षय कुमारच्या 'त्या' फोटोमधील चूक
गौरी खानच्या हातात 'ब्लॅक वॉटर'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
IPS अधिकाऱ्याने सांगितली अक्षय कुमारच्या 'त्या' फोटोमधील चूक
अभिनेत्रींचा सासरच्यांसोबत वाद; काहींनी उघडपणे व्यक्त केला राग

'जनाब, हा तर पडद्यामागचा फोटो आहे. आम्हा कलाकारांसाठी, जेव्हा कधी कॅमेरा ऑन होतो, तेव्हा प्रोटोकॉल पुन्हा पाळला जातो. आपल्या पोलीस दलाचे आम्ही नेहमीच ऋणी आहोत. तुम्ही जेव्हा हा चित्रपट पहाल, तेव्हा तो तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे', असं उत्तर अक्षयने दिलं. त्यावर आयपीएस अधिकारी वीज यांनी पुढे लिहिलं, 'तुमच्या उत्तरासाठी आणि आमच्या दलासाठी दाखवलेल्या आदराबद्दल तुमचे धन्यवाद. मीसुद्धा मस्करीतच कमेंट केली होती आणि तुमचा चित्रपट नक्कीच पाहीन.'

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमार, रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी रोहित शेट्टीची टीम बरीच प्रतीक्षा करत होती. लॉकडाउनदरम्यान अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी ओटीटीचा पर्याय निवडला. मात्र 'सूर्यवंशी'च्या टीमने चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनोरंजनविश्वातील अनेकांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com