'PUBG च्या धर्तीवर ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम लॉंच'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

अक्षय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यानं एक  व्हिडिओ शेयर केला आहे. 

मुंबई -  भलेही पब्जजीनं देशातल्या तरुण पिढिला वेड लावले असेल मात्र दुसरीकडे त्याच्या सारखा गेम आपण तयाक करावा यासाठी गेम्स डेव्हलपर्स तयारीला लागले होते. त्यातील अनेक कंपन्यांनी गेम तयार केलेही. विदेशी ऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वीकार लोकांनी करावा असाही एक विचार गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केला जात आहे.

केवळ चित्रपट नव्हे तर वेगवेगळ्या कारणांसाठी अभिनेता अक्षय कुमार ओळखला जातो. त्याचा मदतशील स्वभाव यामुळेही तो प्रसिध्द आहे. त्यानं नुकतेच अक्षयने PUBG या गेम सारखा FAU-G Fearless and United Guards हा भारतीय गेम लॉंच केला आहे. हा मेड इन इंडिया मल्टी- प्लेयर मोबाइल गेम आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात प्रदर्शित करण्यात आला. अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्रामवर या गेमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार जसा अॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. त्याच प्रमाणे एक प्रयोगशील कलावंत म्हणूनही त्याची ओळख आहे. तो सतत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. असाच एक प्रयोग त्यानं पब्जी गेम्सवर केला होता. त्याचे त्यानं इंडियन व्हर्जेन तयार केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यानं एक  व्हिडिओ शेयर करुन त्यावर “FAU-G Fearless and United Guards. शत्रुचा सामना करा. आपल्या देशासाठी लढा. आपल्या ध्वजाचे संरक्षण करा. Fearless and United Guards – FAU-G हा गेम आपल्याला फ्रंटलाइन आणि त्यापलीकडे नेईल! तुमच्या मिशनची सुरूवात आज करा.” अशा आशयाच कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला 1 तासाच्या आत 8 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

SP Balasubramanian;16 भाषा, 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गाणारा जादुई गायक

बेंगळुरूच्या nCore Games आणि अक्षयने हा गेम डेव्हलप केला आहे. 25 ऑक्टोबर रोजी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा एकदा PUBG Mobile India आल्या नंतर आता त्या गेमसोबत FAU-G चा मुकाबला होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar share video of faug fearless and united guard launched today on social media