'कोरोना को हराना है'; अक्षय कुमारने दिल्या 5 महत्त्वाच्या टिप्स

अक्षयने काही लहान मुलांसोबत मिळून हा व्हिडीओ केला आहे.
akshay kumar
akshay kumarfile image

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकताच अक्षयने कोरोनाबद्दल माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे अक्षयने कोरोना काळात कोणते नियम पाळावेत, त्याबद्दल माहिती दिली आहे. अक्षयने काही लहान मुलांसोबत मिळून हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय आणि लहान मुलांनी कोरोना काळात पाळायच्या पाच टिप्स सांगितल्या आहेत. (akshay kumar shares 5 tips on covid appropriate behaviour in new video)

कोरोनाची लक्षणे असल्यास किंवा कोरोना झाले असेल तर कोणते नियम पाळायचे आणि नियमित नियमांबद्दल या व्हिडीओमध्ये माहिती देण्यात आली आहे. 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' या संस्थेच्या जागरूकता मोहीमे अंतर्गत हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या मोहिमेला 'कोरोना को हराना है' असे नाव देण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला अक्षय कुमार म्हणतो, 'कोरोनाच्या रिपोर्टची वाट पाहत असाल किंवा कोरोना झाला असेल हे नियम नक्की पाळा. कोरोनासोबत प्रत्येक घर लढणार आणि त्यावर विजय मिळवणार. हा व्हिडीओ संयमाने आणि सावध होऊन ऐका.'

महत्वाचे पाच नियम

व्हिडीओमध्ये लहान मुलांनी कोरोना काळामध्ये पाळायचे पाच महत्वाचे नियम सांगितले. वेळोवेळी हाथ धुणे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वत:ला एका खोलीमध्ये आयसोलेट करावे, शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मास्कने नाक आणि तोंड झाकणे, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णालयात दाखल होणे हे पाच नियम या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत.

akshay kumar
केआरकेच्या घरासमोर पोहोचला मिका सिंग; म्हणाला, 'मी तुला मारणार नाही'

'कोरोना को हराना है' ही मोहीम वेगवेगळ्या भाषांमध्ये राबवण्यात येणार आहे. प्रत्येक भाषेमधील प्रसिद्ध कलाकर या मोहिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. हिंदी, मराठी आणि पंजाबी भाषेमध्ये अक्षय कुमारने व्हिडीओ केला असून, तेलुगू भाषेत चिरंजीवी, कन्नड भाषेत पुनित राजकुमार या मोहिमेचा व्हिडीओ करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने कोरोना रूग्णांसाठी मदत केली. ट्विंकलच्या संस्थेने कोरोना रूग्णांसाठी तब्बल 1 कोटींचा निधी जमा केला.

akshay kumar
"निशाच्या वागण्यामुळे यायचे आत्महत्येचे विचार"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com