esakal | अक्षय कुमारचं पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल, ट्विटरवरुन दिली 'ही' माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar into the wild

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतलेल्या एका शोमध्ये लवकरंच खिलाडी कुमार देखील दिसणार आहे. अक्षयने स्वतः याविषयीची माहती त्याच्या ट्विटवरुन दिली आहे.   

अक्षय कुमारचं पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल, ट्विटरवरुन दिली 'ही' माहिती

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतलेल्या एका शोमध्ये लवकरंच खिलाडी कुमार देखील दिसणार आहे. अक्षयने स्वतः याविषयीची माहती त्याच्या ट्विटवरुन दिली आहे.   

हे ही वाचा: सुशांतच्या मृत्युनंतर पाऊण तासापर्यंत शवगृहात होती रिया?

अभिनेता अक्षय कुमार नेहनीच त्याच्या उत्तम कामांसाठी चर्चेत असतो. यावेळी अक्षय चर्चेत आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे. होय अक्षयने मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत एका शोमध्ये सहभाग घेतला आहे. हा तोच शो आहे ज्यामुळे मोदी चर्चेत आले होते. या शोचं नाव आहे 'इन टू द वाईल्ड'. मोदी यांनी या शोमध्ये बेयर ग्रील्ससोबत केलेली जंगल सफारी चांगलीच चर्चेत राहिली होती. आता पंतप्रधान मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर अक्षय कुमार या शोमध्ये सहभागी होणार आहे. अक्षय या शोचा होस्ट असलेल्या बेयर ग्रील्ससोबत जंगलात होणा-या ऍडवेंचरची मजा घेताना दिसेल. याविषयीची माहिती अक्षयने त्याच्या ट्विटरवरुन दिली आहे. 

अक्षयने त्याच्या ट्विटरवर २० सेकंदाचा हा टिझर पोस्ट केला आहे. तसंच याच्यासोबत त्याने त्याच्या अंदाजात म्हटलंय, 'तुम्ही विचार करत असाल की मी वेडा आहे पण केवळ वेडेच असतात जे जंगलात जातात.' हा शो ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता डिस्कवरी प्लस वाहिनीवर टेलिकास्ट होईल. यानंतर हा शो डिस्कवरीच्या सामान्य वाहिनीवर सोमवार १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता टेलिकास्ट केला जाईल. 

यावर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात अक्षय या शोसाठी शूटींग करत असल्याचं समोर आलं होतं. अक्षय आणि बेयर ग्रील्स या शोमध्ये कर्नाटक मधील प्रसिद्ध बांदीपूर टायगर रिझर्वमध्ये जंगलातील परिस्थितीशी दोन हात करतील.  या शोची शूटींग कोरोनाच्या आधीच्या काळात म्हणजेच जानेवारीमध्येच झाली होती. 

बेयर ग्रील्सच्या या शोमध्ये सहभागी होणारा अक्षय कुमार हा तिसरा भारतीय आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत याशोमध्ये सहभागी झाले होते. मोदी आणि ग्रील्स यांनी उत्तराखंडमधील कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये या शोचं शूट केलं होतं. त्यामुळे आता यो शोमधून अक्षयचं नवीन रुप चाहत्यांना पाहायला मिळेल.  

akshay kumar shares teaser of into the wild will be seen with bear grylls in a jungle adventure  

loading image