esakal | बॉलिवूडला मोठा फटका; अक्षयच्या 'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Sooryavanshi

रोहित शेट्टीने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

बॉलिवूडला मोठा फटका; अक्षयच्या 'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. निर्माते आणि रोहित शेट्टी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. "राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहून सूर्यवंशीचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा मोठा आणि कठीण निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी रोहित शेट्टीचं कौतुक केलं", अशी माहिती चित्रपट निर्मात्यांच्या प्रवक्त्यांनी दिली. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवार संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केला. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी घेतला. 

हेही वाचा : अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर महिमाने सोडलं मौन; म्हणाली..

'सूर्यवंशी'चे निर्माते रिलायन्स एंटरटेन्मेंटने गेल्या वर्षी जूनमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची माहिती दिली होती. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र महाराष्ट्र आणि देशातील काही भागांत थिएटर बंद असल्याने ऑक्टोबरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स' आणि 'सिम्बा'नंतर हा पोलिसांशी निगडीत कथेवर आधारित चौथा चित्रपट आहे. 
 

loading image