
अक्षयचा नवा सिनेमा; विमान कंपनीच्या मालकाची भूमिका साकारणार...
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) 'बच्चन पांडे' सिनेमानंतर आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय पहिल्यांदाच राधिका मदान(Radhika Madan)सोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा साऊथच्या सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. अभिनेत्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्या अगोदर सेटवर करण्यात आलेल्या पूजेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री राधिका मदान संपू्र्ण ताकद एकवटून नारळ फोडताना दिसत आहे. या व्हिडीओला शेअर करतानाच अक्षयनं सिनेमासाठी चांगलं नाव सूचवण्याचं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे. अक्षयचा हा सिनेमा एअर डेक्कन या भारतातील अत्यंत स्वस्त विमान कंपनीचे माल जी.आर. गोपीनाथ यांची यशोगाथा मांडणारा आहे.
अक्षयचा हा नवीन सिनेमा एका तामिळ सिनेमाचा रीमेक आहे. 'सोरारई पोट्टू' असं या सिनेमाचं तामिळमध्ये नाव होतं.तर तामिळ स्टार सूर्यानं यात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. अक्षयनं शूटिंगच्या पहिल्या दिवशीचा सेटवरचा माहौल दाखवणारा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,आमच्या सिनेमाचं अद्याप नाव ठरलं नसलं तरी आम्ही शूटिंगला सुरुवात केली आहे. जर तुम्हाला आमच्या सिनेमासाठी काही चांगलं नाव सुचवता आलं तर नक्की सांगा. आणि सिनेमासाठी शुभेच्छा देखील द्या. या व्हिडीओत अक्षयनं ग्रे कलरचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. तर राधिकानं लाल रंगाची साडी नेसली आहे.
हेही वाचा: सारा तेंडुलकर बॉलीवूड एन्ट्रीविषयी मोठा खुलासा; कुटुंबातील सदस्याची माहिती
अक्षयच्या या नव्या सिनेमाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा करीत आहेत, ज्यांनी तामिळ सिनेमाचं दिग्दर्शन देखील केलं होतं. सुरुवातील अक्षय या सिनेमात काम करत नाही असं बोललं जात होतं,पण आता त्यानं स्वतःच सिनेमाच्या शूटिंग सेटवरचा व्हिडीओ शेअर केल्यामुळं तोच या सिनेमात काम करीत आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. या सिनेमात राधिका मदान अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका करीत आहे.
हेही वाचा: 'मुंबई पोलिसांनी खेचत नेत गोदामात...'; अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
अक्षय कुमारच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच दाक्षिणात्य सिनेमा ड्रायव्हिंग लायसन्स चा हिंदी रीमेक असलेल्या सेल्फी मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत इमरान हाश्मी देखील आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी डिस्ने प्लस हॉयस्टारवर अक्षयचा 'मिशन सिंड्रेला' हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. तर राधिका मदान अर्जुन कपूरसोबत कुत्ते सिनेमात दिसणार आहे.
Web Title: Akshay Kumar Starts Shooting For Soorarai Pottru Hindi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..