खिलाडीकुमारचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

अक्षयकुमारने त्याच्या ‘विनोदी भूमिका करणारा हिरो’ अशा इमेजनंतर सामाजिक भूमिका करणारा, देशाबद्दल सार्थ अभिमान असणारा हिरो अशी इमेज बनवली. त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘पॅडमॅन’, ‘ओह माय गॉड’ या चित्रपटातून त्याने त्याची इमेज पूर्ण बदलून टाकली. ‘रुस्तम’मधल्या रुस्तम पावरीने त्याला देशभक्त अशी बिरुदावलीच लावली. त्यामुळे अक्षयकुमारला प्रत्येक कंपनी आपला ब्रॅण्ड अँम्बेसिडर बनवू इच्छित आहे. पण अक्षयकुमारने अशा अनेक ऑफर्स धुडकावून लावल्या आहेत.

तो म्हणतो, की मी कोणत्याही चुकीच्या गोष्टींना समर्थन देणार नाही. कारण एक सेलिब्रेटी म्हणून प्रेक्षक तुमच्याकडे पाहतात. त्यांना चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी कोणत्याही चुकीच्या ब्रॅण्डची जाहिरात करणार नाही. तसेच तो पुढे म्हणाला, की लोकांनीही कोणाला आणि कशासाठी फॉलो करायचं, हे भान ठेवलं पाहिजे. मी इतरांनाही हाच सल्ला देईन की चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar suggestion