अक्षय कुमार 'इन टू द वाईल्ड..' शोमध्ये प्यायला हत्तीच्या शौचची चहा, वाचा मजेदार किस्सा

akshay kumar drink elephent poop tea
akshay kumar drink elephent poop tea

मुंबई- अक्षय कुमार बॉलीवूडचा 'खिलाडी' आहे तसंच साहसी खेळ खेळण्याची त्याला खूप आवड आहे. अक्षय Into the wild with bear grylls या शोमध्ये दिसणार आहे. शोचा इंटरेस्टिंग प्रोमो दाखवला गेला आहे. ज्यामध्ये तो हत्तीच्या शौचंंची चहा पिताना दिसला होता. अक्षय त्याच्या बर्थडे निमित्त 'बेल बॉटम' सिनेमातील को-स्टार हुमा खुरेशी आणि शोचा होस्ट बेयर ग्रिल्ससोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता. यादरम्यान त्याने अनेक मजेदार गोष्टींचा खुलासा केला.  

अक्षय कुमारने कोरोना काळात शूटींगला सुरुवात केली आहे. ९ सप्टेंबरला अक्षयचा वाढदिवस होता. यानिमित्ताने तो हुमा खुरेशीसोबत त्याच्या इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता. या लाईव्ह सेशन दरम्यान त्यांच्यासोबत बेयर ग्रील्सदेखील होता. अक्षयने या दरम्यान अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली. अक्षय कुमारने हे देखील सांगितलं की त्याने त्याचा बर्थडे कसा सेलिब्रिटी केला. त्याने सांगितलं की बर्थडे दिवशी त्याने त्याच्या कुटुंबासोबत पूर्ण दिवस ऍन्जॉय केला. तो त्यांच्यासोबत पिकनीकला गेला होता. यावेळी अक्षयला हुमाने विचारलं की तो प्रोमोमध्ये हत्तीच्या शौचची चहा पिताना दिसला होता. बेयर ग्रील्सने असं करण्यासाठी तुला कसं काय तयार केलं?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@beargrylls @iamhumaq @discoveryplusindia @discoverychannelin

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

यावर अक्षय कुमारने सांगितलं की त्याला आयुर्वेदिक कारणांमुळे गोमुत्र पिण्याची सवय आहे तेव्हा त्याला हत्तीच्या शौचची चहा पीणं एवढं कठीण वाटलं नाही. अक्षयच्या या उत्तरावर सगळेच आश्चर्यचकित झाले. त्याचा हा प्रोमो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. अक्षयला हे करताना काय वाटलं असेल हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच इच्छा होती अखेर याचा खुलासा अक्षयने त्याच्या या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये केला.   

akshay kumar used to drink cow urine he told to into the wild with bear grylls during insta live  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com