चाहत्याचा कहर! डोक्यावरचे केस ओढून अक्षयला फोटोसाठी बळजबरी|Akshay Kumar video Viral fan misbehavior | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar video Viral fan misbehavior

चाहत्याचा कहर! डोक्यावरचे केस ओढून अक्षयला फोटोसाठी बळजबरी

Viral Video News: चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचा एखादा लूक मिळावा असे नेहमीच वाटत असते. याउलट त्या सेलिब्रेटीनं आपल्याला ऑटोग्राफ द्यावा किंवा त्याच्यासोबत एखादा फोटो मिळावा ही त्यांची माफक अपेक्षाही असते. मात्र अनेकदा चाहते त्या सेलिब्रेटीला (Social media news) एवढे गृहित धरतात की त्या प्रेमाचा अतिरेक होताना दिसतो. जसं प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या बाबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.(Bollywood News) त्याच्यासमवेत फोटो काढण्यासाठी एका चाहत्यानं त्याला धक्काबुक्की करत त्याच्या डोक्यावरची केसं ओढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून (Bollywood Actor Akshay Kumar) आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्या चाहत्याला फटकारले आहे. चाहते फोटोच्या नादात आपली हद्द कशी पार करतात याचं उदाहरण या व्हिडिओच्या निमित्तानं दिसून आले आहे.

बॉलीवूडचा खिलाडी म्हणून अक्षय कुमारला सारं बॉलीवूड ओळखतं. प्रेक्षकांमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. अशावेळी तो जेव्हा चाहत्यांच्या गराड्यात जातो तेव्हा त्याच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी अनेकजण गर्दी करताना दिसतात. मात्र त्यावेळी चाहत्यांच्या प्रेमाचा अतिरेक झाल्याचे दिसुन आले आहे. एकानं तर अक्षयसोबत काहीही झालं तरी फोटो घ्य़ायचा म्हणून त्यानं चक्क अक्षयच्या डोक्याला हात लावत त्याची केसं ओढत फोटो घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओतून दिसून आले आहे. त्यामुळे संतापलेल्या अक्षयनं त्या उद्दाम चाहत्याला फोटो देण्यास नकार दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

अक्षयसोबत त्याचे बॉडीगार्डही होते. मात्र एवढ्या मोठ्या गर्दीला नियंत्रित करणं त्यांच्याही आवाक्याबाहेरची गोष्ट होती. अशावेळी एका चाहत्यानं केलेल्या विचित्रपणामुळे त्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील अक्षयच्या काही कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचा गोंधळ झाला आहे. मात्र त्यानं मोठ्या संयमान ती परिस्थिती हाताळली होती. अक्षयनं त्या व्यक्तीला हात दाखवून त्याची चूक निदर्शनास आणून दिली आहे. त्या व्हिडिओला हजारो लाईक्स आले असून त्याला आलेल्या कमेंट्सवरुन नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीवर सडकून टीका केली आहे.