गाणं अक्षयच्या कल्पनेतलं 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारचा आगामी चित्रपट "जॉली एल.एल.बी. 2'चा नुकताच टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या गाण्यावर अक्षयकुमार व हुमा कुरेशी थिरकलेत आणि हे गाणं कंपोज केलंय आणि गायलंय मीत ब्रदर्सने. या गाण्याचा एक मजेदार किस्सा आहे. खरं तर या गाण्याची ट्यून अक्षयच्या डोक्‍यात आली. ती पण मुलगी नितारासोबत खेळत असताना. हे कसं काय शक्‍य आहे, असा तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना! नितारा "ही ईज अ जॉली गो फेलो...' ही कविता गात होती आणि हीच कविता अक्षयच्या डोक्‍यात घोळू लागली. मग त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना सांगितलं, की या कवितेचा वापर करून चित्रपटासाठी चांगलं गाणं बनू शकतं.

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारचा आगामी चित्रपट "जॉली एल.एल.बी. 2'चा नुकताच टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या गाण्यावर अक्षयकुमार व हुमा कुरेशी थिरकलेत आणि हे गाणं कंपोज केलंय आणि गायलंय मीत ब्रदर्सने. या गाण्याचा एक मजेदार किस्सा आहे. खरं तर या गाण्याची ट्यून अक्षयच्या डोक्‍यात आली. ती पण मुलगी नितारासोबत खेळत असताना. हे कसं काय शक्‍य आहे, असा तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना! नितारा "ही ईज अ जॉली गो फेलो...' ही कविता गात होती आणि हीच कविता अक्षयच्या डोक्‍यात घोळू लागली. मग त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना सांगितलं, की या कवितेचा वापर करून चित्रपटासाठी चांगलं गाणं बनू शकतं. ही कल्पना निर्मात्यांनाही आवडली. या गाण्याचं चित्रीकरण मुंबईत पार पडलं. या गाण्यात अक्षय वेगवेगळ्या अवतारात दिसतो आहे. कधी कृष्णाचा अवतार; तर कधी आपल्या स्कूटरवर वकिलाच्या अवतारात तो दिसतोय. 

Web Title: Akshay Kumars Dream song from 'Jolly LLB 2' is a