अक्षय कुमारला कोरोनाने केलंय बेजार!

बहुचर्चित पृथ्वीराज सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता....
Akshay Kumar
Akshay KumarGoogle

अक्षय कुमारचे(Akshay Kumar) सिनेमे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी फु्ल टू मनोरंजनाची मेजवानी ठरत आलेले आहेत. सुरुवातीला अॅक्शन सिनेमांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास रोमॅंटिक कॉमेडी, सोशल अशा वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांनी अधिकाधिक रंगत गेला अनं प्रेक्षकांच्या फेव्हरेट हिरोंच्या यादीत अक्षय विराजमान झाला. आता लवकरच त्याचा बहुचर्चित 'पृथ्वीराज'हा ऐतिहासिक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'जानेवारी 2022' ला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे पण सूत्रांच्या बातमीनुसार आता हे प्रदर्शन लांबण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या सुरुवातीला अक्षय कुमारचा 'बेलबॉटम' प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये 50 टक्के लोकांनाच एन्ट्री होती. लॉकडाऊनचा जोर सुरूच होता. नियमावली कडक होत्या. पण त्यावरही मात करीत अक्षयच्या नावावर चित्रपट चांगला चालला. यानंतर त्याचा 'सुर्यवंशी' दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. नुकताच अक्षयचा 'अतंरगी रे' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

Akshay Kumar
'फेस ऑफ द फेअरनेस क्रीम' यामी गौतम झुंजतेय या गंभीर त्वचारोगाशी...

एकमात्र आहे अक्षय कुमारमध्ये अजूनही ती ताकद आहे की फक्त त्याच्या नावावर सिनेमे चालतात. पण अशा अक्षयच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' सिनेमाला आणि सोबत अक्षयलाही कोरोनानं त्रास दिल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचं झालं असं की अक्षयच्या पृथ्वीराज सिनेमाचा टीझर गेल्या 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. ज्याचा फर्स्ट लूक लोकांना तुफान आवडला. काल म्हणजेच 27 डिसेंबरला पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार होता. पण तो झालाच नाही. याचं कारण आहे कोरोना. आता कोरोना कोणाला झालाय की नं होताच त्यानं डोक्याला आणखी काही ताप दिलाय. नेमकं झालंय काय ते जाणून घेऊया.

Akshay Kumar,Manushi Chillar
Akshay Kumar,Manushi ChillarGoogle

चांगल्या कलाकारांना पुन्हा बिग स्क्रीनवर पाहण्यासाठी लोकं तरसली आहेत आणि असं असताना पुन्हा कोरोनाच्या नव्या विषाणूनं डोकं वर काढल्यानं नव्या कडक नियमांनी बडगा उभारला आहे. हा बडगा म्हणजे नाइट कर्फ्यु. यामुळे रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी. म्हणजे आली की नाही पंचाईत. याचा सर्वात मोठा फटका हा सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमांना बसतोय आणि आपसूक मग सिनेमांना. सरत्या वर्षाला टाटा-बाय बाय करताना होणा-या पार्ट्यामंधली गर्दी टाळावी आणि कोरोना पसरू नये म्हणून ही नियमावली लागू केलीय. पण कोरोनाच्या नवीव विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा नियम अधिक काळ पुढेही कायम ठेवला जाईल अशीही बातमी आहे. त्यामुळे 'पृथ्वीराज' सारखा बिग बजेट सिनेमा अशा कालावधीत प्रदर्शित केला तर बॉक्सऑफिस कलेक्शनवर परिणार होईल अशी भीती सिनेमांचे निर्माते आणि यशराज फिल्म्सला सतावतेय. म्हणून त्यांनी सिनेमाचा केवळ 27 डिसेंबरचा ट्रेलरच नाही तर 21 जानेवारी 2022 चं सिनेमाचं प्रदर्शनही पुढे ढकललं जाईल असे संकेत दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com