विश्‍वामित्र-मेनकेची आधुनिक कथा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

आधुनिक विश्‍वामित्र व मेनकेची कथा झी टीव्हीवरील "पिया अलबेला' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा पूजा व नरेनभोवती फिरते. नरेन हा पूर्णपणे अध्यात्मिक विचारांचा असून पूजा प्रॅक्‍टिकल व व्यवहारवादी विचाराची आहे. या दोघांमधील नात्याचे रूपांतर प्रेमात कसे होते हे रसिकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नरेनच्या भूमिका अक्षय म्हात्रेने; तर पूजाची भूमिका शीना दासने साकारली आहे. निर्माते सूरज आर. बडजात्या म्हणाले, विश्‍वामित्र-मेनकेच्या कथेशी साम्य असले, तरी ही काही पौराणिक कथा नाही. यातील व्यक्तिरेखा आजच्या काळातील आहेत. या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

आधुनिक विश्‍वामित्र व मेनकेची कथा झी टीव्हीवरील "पिया अलबेला' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा पूजा व नरेनभोवती फिरते. नरेन हा पूर्णपणे अध्यात्मिक विचारांचा असून पूजा प्रॅक्‍टिकल व व्यवहारवादी विचाराची आहे. या दोघांमधील नात्याचे रूपांतर प्रेमात कसे होते हे रसिकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नरेनच्या भूमिका अक्षय म्हात्रेने; तर पूजाची भूमिका शीना दासने साकारली आहे. निर्माते सूरज आर. बडजात्या म्हणाले, विश्‍वामित्र-मेनकेच्या कथेशी साम्य असले, तरी ही काही पौराणिक कथा नाही. यातील व्यक्तिरेखा आजच्या काळातील आहेत. या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. "पिया अलबेला' ही मालिका सोमवार ते शुक्रवारी रात्री 8.30 वाजता झी टीव्हीवर प्रसारित होते आहे. 
 

Web Title: Akshay Mhatre, Sooraj R. Barjatya and Sheen Das

टॅग्स