esakal | Bigg Bossच्या घरात जाण्याआधी 'डॅडी'च्या जावईने घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay-Waghmare

Bigg Bossच्या घरात जाण्याआधी 'डॅडी'च्या जावईने घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन चांगलाच गाजत आहे. कोणत्या न कोणत्या कारणांवरून हा शो व शोमधील स्पर्धक चर्चेत असतात. या शोमधील एका स्पर्धकावर सध्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो स्पर्धक म्हणजे अरुण गवळीचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे Akshay Waghmare. अक्षय हा यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहे. बिग बॉसच्या घरातील त्याची खेळी प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अक्षयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामुळे अक्षयचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

अक्षयने मराठी बिग बॉसच्या घऱात जाण्यापूर्वी मरणोत्तर अवयवदानाचा (Organ Donation) निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे चाहते अत्यंत खुश आहेत. त्याच्या या निर्णयाचे सगळे कौतुक करत आहेत. त्याने मरणोत्तर अवयव दानाचे संमतीपत्र भरून दिले आहे. त्या संमतीपत्रानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड, स्वादुपिंड, किडनी आणि त्वचा दान करणार आहे.

हेही वाचा: BBM 3: 'हाच विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?

अक्षय वाघमारेचा जन्म मुंबईत झाला असून त्याने मुंबईतच शिक्षण पूर्ण केले. अक्षय हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो मॉडेलिंगसुद्धा करतो. सोशल मीडियावर सक्रीय असणारा अक्षय त्याच्या फिटनेसचे व्हिडिओ सातत्याने चाहत्यांसोबत शेअर करत असतो. २०१९ मध्ये अक्षय वाघमारेला 'हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही' (Hotest Man Of The Marathi TV ) हा किताबदेखील मिळाला होता. अक्षयने आतापर्यंत फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या मराठी सिनेमांत काम केले आहे. त्याशिवाय 'ती फुलराणी' या मालिकेतही त्याने काम केले आहे.

loading image
go to top