अक्षया देवधरची नवी इनिंग..गूडन्यूज देत म्हणाली..Akshaya Deodhar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Deodhar

Akshaya Deodhar: अक्षया देवधरची नवी इनिंग..गूडन्यूज देत म्हणाली..

Akshaya Deodhar: अक्षया देवधर सध्या सिनेमा किंवा मालिकांपेक्षा अधिक सक्रिय दिसते ती सोशल मीडियावर. ती अनेकदा तिचे व्हिडीओ,रील्स शेअर करत असते. नेटकरी देखील त्याला मनापासून पंसती दर्शवतात.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अक्षया आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली अन् अर्थात एकमेकांची देखील. काही महिन्यांपूर्वी अक्षया आणि हार्दिकचं लग्न झालं . त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली आणि लग्नानंतरही दोघे डिमांडमध्ये आहेत.

हार्दिकनं सिनेमातनं आपली घोडदौड सुरु केलीच आहे,त्याचा जम उत्तम बसलाय तिकडं..त्याचा बडा सिनेमा लवकरच भेटीस येतोय तितक्यातच आता अक्षयानं एक गूडन्यूज देत तिच्या चाहत्यांना खूश करून टाकलं आहे.

चला जाणून घेऊया अभिनेत्रीच्या त्या गूडन्यूज विषयी..(Akshaya Deodhar new inning marathi actress instastory viral)

अक्षया देवधरनं नुकतीच एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिनं आपल्या नव्या इनिंग विषयी माहिती दिली आहे. अक्षयाचा सोशल मीडियावर चाहता वर्ग मोठा आहेच आता त्याच्यात दुपटीनं वाढ होणार असं दिसतंय.

कारण अक्षयानं स्वतःचं युट्युब चॅनल काढला आहे. ज्याची माहिती तिनं इन्स्टा स्टोरी पोस्ट करत दिली आहे. तिनं आपला पहिला व्हिला व्हिडीओ देखील आपल्या या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ आहे अक्षयानं साजऱ्या केलेल्या तिच्या पहिल्यावहिल्या वटपौर्णिमेचा. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. वटपौर्णिमेच्या व्हिडीओत अक्षया पिवळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिकरित्या वडाची पूजा करताना दिसत आहे.

Akshaya Devdhar Post

Akshaya Devdhar Post

अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहते भलतेच खूश आहेत. आता लोकांना उत्सुकता आहे ते आपली आवडती नायिका तिच्या युट्युब चॅनेलवर मनोरंजनाची मेजवानी कोणत्या माध्यमातून आपल्या भेटीस आणते याकडे. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीत यु ट्युब चॅनेलची लिंकही दिली आहे आणि चाहत्यांना आपलं चॅनेल सबस्क्राइब करायची विनंती देखील केली आहे.