Sanya Malhotra: दंगल गर्ल सान्या मल्होत्राला पडलीय 'नागराज अण्णा'ची भुरळ..म्हणाली..

ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत सान्या मल्होत्रानं नागराज मंजुळे संबंधित केलेल्या विधानांनी सगळेच हैराण आहेत.
Sanya Malhotra speaks about Nagraj Manjule
Sanya Malhotra speaks about Nagraj ManjuleEsakal

Sanya Malhotra: 'दंगल' पासून सुरु झालेला अभिनेत्री सान्या मल्होत्राचा प्रवास हा आता 'कटहल' पर्यंत येऊन थांबलेला आहे. सान्याचा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'कटहल' हा सिनेमा दोन आठवड्यापूर्वीच रिलीज झालाय आणि सिनेमाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

सान्यानं आतापर्यंत केलेल्या तिच्या सिनेमांचा एकंदरीत आलेख पाहता त्याच्यात खूप वैविध्य दिसून येतं. एका विशिष्ट पठडीत तिच्या सिनेमांच्या कथा कधीच बांधलेल्या दिसल्या नाहीत. मग आमिर खानसोबतचा तिचा 'दंगल' असो की आयुष्मान खुराना सोबतचा 'बधाई हो' असो की आताचा 'कटहल' सिनेमा असो..

सान्याची सिनेमांची चॉईस खूप हटके राहिली आहे. अर्थात सिनेमांच्या कथांसोबतच तिचा सहज अभिनय हा देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात महत्त्वाचा ठरला. (Sanya Malhotra speaks about Nagraj Manjule and marathi Movie)

Sanya Malhotra speaks about Nagraj Manjule
Sulochana Latkar: त्या आल्या की खुप भव्य झाल्यासारखं व्हायचं... मिलिंद गवळी दीदींच्या आठवणीत भावुक

सान्यानं नुकतीच ईसकाळला मुलाखत दिली त्यात तिनं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी मोकळेपणानं संवाद साधला. या मुलाखतीत तिनं खास मराठी भाषाच नाही तर मराठी सिनेमांवरचं आपलं प्रेमही व्यक्त केलं.

सेटवर मराठी शब्दांचा सहज वापर होतो आणि ते खास शब्द कोणते याविषयी देखील सान्या मल्होत्रा बोलली. सान्यानं दिग्दर्शक नागराज मंजुळे याचे सिनेमे आपल्याला खूप आवडतात हे सांगताना त्याचा 'सैराट' सिनेमा आपण किती वेळा पाहिलाय याविषयी आकडा सांगत हैराण करून सोडलं.

Sanya Malhotra speaks about Nagraj Manjule
Sulochana Didi: भिकाऱ्याने दिलेल्या 'त्या' वस्तूची सुलोचना दीदींनी आयुष्यभर पूजा केली.. वाचा खास किस्सा..
Sanya Malhotra speaks about Nagraj Manjule
Sulochana didi: घड्याळ जपून ठेवलंय पण आता त्यातली वेळ थांबली.. दिग्दर्शक महेश टिळेकर यांची भावूक पोस्ट..

सान्यानं या मुलाखतीत नागराज सोबत काम करण्याची संधी मिळाली तर आपल्याला आवडेल असं देखील स्पष्ट केलं. सध्या बॉलीवूडमध्ये देखील मध्यवर्ती व्यक्तिरेखा महाराष्ट्रीयन दाखवण्याचा फंडा यशस्वी झाला आहे,त्यामुळे आपल्याला जर अशी एखादी व्यक्तिरेखा ऑफर झाली तर ती मराठी मुलगी सिनेमात रंगवायला आवडेल असं देखील सान्या मुलाखतीत म्हणाली.

'बधाई हो' या तिच्या सिनेमाची कथा खूपच वेगळी होती,त्यामुळे असा सिनेमा बॉक्सऑफिसवर किती चालेल याविषयी शंका होती. तेव्हा सिनेमाला हो म्हणायला किती वेळ लावला याचा खुलासा देखील सान्या मल्होत्रानं मुलाखतीत केला. सान्या मल्होत्राच्या मुलाखतीची लिंक बातमीत जोडलेली आहे. नक्की पहा...

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com