हार्दिक-अक्षयाचा लंडनमधील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल.. लग्नापूर्वीच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshaya deodhar shared romantic video about her and hardeek joshi london trip before marriage

हार्दिक-अक्षयाचा लंडनमधील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल.. लग्नापूर्वीच..

झी मराठी वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि (akshaya deodhar) अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) यांनी खऱ्या जीवनातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साखरपुडा केला. त्यांनी साकारलेल्या राणा आणि अंजली या पात्रांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं चर्चेत होते. पण त्यांनी त्यांच्या प्रेमाबाबत गोपनियता बाळगली गेली होती. साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाची सर्वजण वाट पाहत आहेत. पण लग्नाआधीच अक्षया आणि हार्दिक लंडन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याचे फोटोही त्यांनी शेयर केले होते . आता लंडन मध्ये शूट केलेला एक रोमॅंटिक व्हिडिओ अक्षयाने शेयर केला आहे. (akshaya deodhar shared romantic video about her and hardeek joshi london trip before marriage)

अक्षया आणि हार्दिक लंडन दौऱ्याहून आल्यापासून फोटो शेयर करत आहे. दोघांनीही अगदी जीवाचं लंडन केल्याचं या त्यांच्या फोटोंवरून दिसते. आता तर अक्षयाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा लंडनमधील एक व्हिडीओ शेअर केला आहेत. या व्हिडिओमध्ये लंडन मधील काही ठिकाणं आणि दोघेही एकमेकांसोबत आनंद लुटताना दिसत आहेत. लग्नापूर्वीची त्यांची ही ट्रिप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अक्षया आणि हार्दिकचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते लग्नाआधी लंडनला का गेले असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत यांचे लग्न पुण्यामध्येच होईल असे अक्षया आणि हार्दिक ने सांगितले होते. सध्या ते दोघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचेही बोलले जात आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणादा आणि पाठकबाईंची जोडी घराघरात पोहोचली. त्यांनंतर ते दोघेही बराच काळ एकत्र होते. त्यांच्यातील खास मैत्रीची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर रंगली होती. ते लग्न करतील असे कुणालाही वाटले नव्हते. पण अखेर आता या जोडीनं एकत्र येऊन साखरपुडा केला आणि एकमेकांचे कायमचे सोबती झाले.