Akshaya-hardeek: लग्नानंतरचा पहिला सेल्फी शेयर करत पाठकबाई म्हणाल्या.. आता लवकरच..

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी लग्नानंतर एक खास पोस्ट शेयर केली आहे.
Akshaya deodhar shared selfie photo with husband hardeek joshi after wedding
Akshaya deodhar shared selfie photo with husband hardeek joshi after weddingsakal
Updated on

Hardeek & Akshaya Wedding : 'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर चाहत्यांना भलताच आनंद झाला होता. ते कधी एकदा लग्नगाठ बांधणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर तो दिवस उगवला आणि शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडले. पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. आता लग्नानंतर अक्षयाने एक खास सेल्फी शेयर करत पोस्ट लिहिली आहे.

Akshaya deodhar shared selfie photo with husband hardeek joshi after wedding
Controversial statement: परेश रावल तर सोडाच.. या सेलिब्रिटींची वादग्रस्त विधानं ऐकून घाम फुटेल..

लग्नानंतरचा पहिलाच सेल्फी आहे. ज्यामध्ये अक्षया हिरवी साडी, कपाळावर लाल टिकली, गळ्यात मंगळसूत्र अशा सुवासिनीच्या वेशात दिसत आहे. सोबत हार्दिकही असल्याने दोघांनी गोड स्माईल करत हा सेल्फी क्लिक केला आहे.

Akshaya deodhar shared selfie photo with husband hardeek joshi after wedding
Bigg Boss Marathi 4: ज्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिले तिथल्या कर्मचाऱ्यांनी.. तेजस्विनी लोणारीला आला हा अनुभव..

अक्षयाने या फोटोसोबत एक पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, ''राणा - अंजलीवर तुम्ही भरभरून प्रेम केले, अगदी अपेक्षेपेक्षा जास्त. आमच्यावरही प्रेम केलंत. आमच्या लग्नामध्ये चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम आणि एकूणच निर्माण झालेलं सकारात्मक वातावरण पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आता आमचं नवं आयुष्य सुरु होत आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तसेच लग्नाचे आणखीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करू लवकरच..'' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे एकत्र काम केले आहे, झी मराठी वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून ते एकत्र आले. त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3 मे 2022 रोजी त्यांनी अत्यंत दिमाखात आपला साखरपुडा उरकला. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ते त्यांच्या लग्नाची. अखेर साखरपुड्यानंतर पाच महिन्यांनी ते लग्न बंधनात अडकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com