
Bigg Boss Marathi 4: ज्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिले तिथल्या कर्मचाऱ्यांनी.. तेजस्विनी लोणारीला आला हा अनुभव..
tejaswini lonari: बिग बॉस मराठीचा खेळ सध्या चांगलाच रंगत आहेत. स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चुरस वाढत असतानाच गेल्या आठवड्यात अचानक अभिनेत्री टेजस्विनी लोणारीला घराबाहेर जावे लागले. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जाणे अपिरहार्य आहे असे बिग बॉसने तीला संगितले. तेजस्विनीला गंभीर इजा झाल्याने नाईलाजाने हा निर्णय तिला मान्य करावा लागला. त्यानंतर घराबाहेर आलेल्या तेजस्विनीने एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
(tejaswini lonari shared emotional experience after leaving bigg boss marathi 4 house)
तेजस्विनी पहिल्या दिवसापासूनच टॉप 5मध्ये असल्याचे बोलले जात होते. अत्यंत हुशारीनं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन ती गेम खेळत होती. अनेकांशी तिची घट्ट मैत्री झाली होती. अगदी सुरुवातीला भांडणाऱ्या अपूर्वाशीही तिचे छान सूट जुळेले होत. मात्र टास्कमध्ये झालेल्या मारामारीमुळे तेजस्विनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर उपचारही सुरू झाले पण दुखापत गंभीर असल्याने आणि तशा अवस्थेत तिला खेळ खेळणे शक्य नसल्याने तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय बिग बॉस ने घेतला. आता घराबाहेर पडल्यानंतर तीन दिवसांनी तिने आपला अनुभव एका पोस्टद्वारे सांगितला आहे.
या पोस्टमध्ये ती म्हणाली आहे, '''नमस्कार, कसे आहात सगळे...? हा प्रश्न मी करायच्या आधीच तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी कशी आहे...? खरं सांगू, तुमच्या प्रेमामुळे मी एकदम मस्त आहे. आता फ्रॅक्चरमुळे थोडा हात दुखतो आहे पण तुमच्या प्रेमामुळे त्या वेदना सहन करायची ताकद मला मिळाली आहे. असं म्हणतात कि आईपेक्षा जास्त निर्वाज्य प्रेम करणारे जगात कोणीच नसतं पण आई पेक्षाही जास्त प्रेम करणारी महाराष्ट्रातील जनता आहे. ती पुढे म्हणतेय कि, घरातून बाहेर पडणे माझ्यासाठी जेवढे अवघड होते तेवढेच तुमच्यासाठी होते. मी तुमच्या प्रेमाच्या ताकदीवर खेळ पुढे खेळण्याचा निर्णय घेतला होता...पण बिग बॉसच्या निर्णयापुढे कसं जाणार...?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तेजस्विनीला हॉटेलमध्ये नेण्यात आले. तिथला अनुभव संगताना तेजस्विनी म्हणाली.. 'हॉलेटमधून बाहेर पडल्यावर ज्या गाडीतून घराकडे निघाले ते ड्रायव्हर दादा कंठ दाटून तुम्ही कसे हवे होतात फिनालेमध्ये हे वारंवार सांगत होते. मी माझ्यासाठी तळमळीने बोलणारी माणसे घरातून बाहेर पडल्यावर काही मिनिटात अनुभवत होते'.
तेजू म्हणाली, 'मी ज्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिले त्या हॉटेलचे कर्मचारी मला त्या हॉटेलमध्ये पाहिल्या पाहिल्या रडायला लागले. आज तर शनिवार नाही मग तुम्ही कशा बाहेर आलात? तुम्ही बिग बॉसना सांगून थांबायचं ना घरातच, असे अनेक प्रश्न मला येत होते आणि त्यावर मला काहीच उत्तर देता येत नव्हती'.
पुढे ती म्हणाली, ‘तुमचे आभार मी कधीच मानणार नाही कारण तुमच्या प्रेमाची उतराई नाही करायची मला , मी आभार मानायचे असेल तर बिग बॉसचे मानेन कारण त्यांच्यामुळे मला माझी माणसं मिळाली. तुमच्या ह्या प्रेमाच्या ताकदीवर लवकर बरे तर होणारच आहे मी, पण अधिक मेहनतीने तुमच्या मनोरंजनासाठी सुद्धा सज्ज व्हायचं आहे. शेवटी एकच सांगेन …हाथ टुटा है…हौसला नहीं …लवकरच भेटू’. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.