esakal | पाठकबाईंचा शिवजयंती विशेष व्हिडीओ एकदा पाहाच! तुमचाही  ऊर अभिमानाने भरून येईल
sakal

बोलून बातमी शोधा

akshaya deodhar

अक्षयाच्या या व्हिडीओला अवघ्या काही मिनिटांत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. 

पाठकबाईंचा शिवजयंती विशेष व्हिडीओ एकदा पाहाच! तुमचाही  ऊर अभिमानाने भरून येईल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णसुद्धा केलं. रयतेच्या सुखासाठी जिवाचं रान करणाऱ्या शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने शत्रूशी दोन हात केले. त्यांनी एका आदर्श स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राच्या या जाणता राजाची देवाप्रमाणेच पूजा केली जाते आणि त्यांचा आदर्श पिढ्यानपिढ्या घेतला जावा यासाठी शिवजयंती ही उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. अनेक ठिकाणी ढोल ताशांचा गजर, शिवप्रेमींनी भारावलेलं वातावरण पाहायला मिळतं. सोशल मीडियावरही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेत्री अक्षया देवधरने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळतेय. 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर हिने शिवजयंतीनिमित्त खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करताना, वंदन करताना आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतेय. अक्षयाचा हा व्हिडीओ अत्यंत सुंदर पद्धतीने एडिट करण्यात आला आहे. 'तान्हाजी' या चित्रपटातील 'मायभवानी' या गाण्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. अक्षयाच्या या व्हिडीओला अवघ्या काही मिनिटांत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. 

हेही वाचा : ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये हा अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज 

हेही वाचा : सलमानच्या 'बिग बॉस'चा टीआरपी ऐकून व्हाल थक्क! जाणून घ्या 'टॉप ५' मालिकांचे व्ह्यूज

अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. पहिलीच मालिका असूनही तिने अल्पावधीत लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेत अक्षया नेहमीच सोज्वळ रुपात प्रेक्षकांना दिसली. मात्र सोशल मीडियावर अक्षयाने ग्लॅमरस लूकमधील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. अक्षयाचं नाव अभिनेता सुयश टिळकसोबत जोडलं गेलं. मात्र या दोघांनी कधीच माध्यमांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा होत्या. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे या चर्चा रंगल्या होत्या.