esakal | काय चाललंय? शहनाज गिलच्या फोनचा वॉलपेपर पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

shehnaaj gill

पापाराझींनी काढलेल्या या व्हिडीओत तिच्या वॉलपेपरवरील फोटो स्पष्ट पाहायला मिळतोय.

काय चाललंय? शहनाज गिलच्या फोनचा वॉलपेपर पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

sakal_logo
By
स्वाती वेमूल

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला हे सध्या देशातील सर्वांत चर्चेतील व लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. या दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या प्रेमाची कबुली माध्यमांसमोर दिली नाही. पण कार्यक्रमांना किंवा इतर ठिकाणी हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात. शहनाजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये तिच्या फोनचा वॉलपेपर स्पष्ट दिसून येत आहे. मुंबई विमानतळावर शहनाजचा हा व्हिडीओ काढण्यात आला आणि त्यावेळी तिच्या हातातील फोनवरील वॉलपेपरवर कॅमेरा फोकस करण्यात आला. 

पापाराझींनी काढलेल्या या व्हिडीओत तिच्या वॉलपेपरवर सिद्धार्थसोबतचा तिचा फोटो स्पष्ट पाहायला मिळतोय. या दोघांना चाहत्यांनी 'सिदनाझ' असं नाव दिलंय आणि याच नावाने हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सिद्धार्थ आणि शहनाज रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. काहींनी तर या दोघांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. 

हेही वाचा : "माझी मुलगी अजूनही स्ट्रगल करतेय"; घराणेशाहीच्या वादावर सुप्रिया पिळगावकर 

हेही वाचा : PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी

शहनाजच्या आगामी चित्रपटाची घोषणा अभिनेता दिलजित दोसांजने गुरुवारी केली. 'हौसला रख' या चित्रपटात शहनाज महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून त्याच्याच शूटिंगसाठी ती कॅनडाला रवाना होत होती. 'बिग बॉस'च्या तेराव्या सिझनमध्ये शहनाज व सिद्धार्थची मैत्री झाली. तेव्हापासूनच या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर दोघांनी काही म्युझिक व्हिडीओसाठी एकत्र काम केलं. या दोघांचं 'शोना शोना' हे गाणं चांगलंच गाजलं. नुकताच शहनाजचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून तिचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला.