आलिया भटची नीतू सिंग यांच्या फोटोवरील कमेंट वायरलEntertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आलीया भट्ट
आलिया भट म्हणाली,''व्वा! सासुबाई खूप सुंदर''

आलिया भट म्हणाली,''व्वा! सासुबाई खूप सुंदर''

आलिया भट आणि रणबीर कपूरचं अजून लग्न झालं नसलं तरी कपूर कुटुंबाने तिचा आपली सुन म्हणून केव्हाच स्विकार केलाय. आणि याचे दाखले आपल्याला अनेक कार्यक्रमातून तसंच फोटोतून पाहायला मिळतात. कपूर कुटुंबाच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात आलियाची हजेरी असतेच, तर कपूर कुटुंबही भट्ट परिवाराच्या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावतात. नीतू सिंग आणि आलियाचं म्हणजेच या होणा-या सासु-सुनेचं नातंही घट्ट आहे बरं का. कारण या दोघीही ब-याचदा रणबीर सोबत नसला तरी लंच,डिनर,शॉपिंगला एकत्र भेटून धम्माल करतात आणि आपल्या सोशल मीडियावर ते फोटोही शेअर करतात.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर ब-याच दिवसांनी नीतू कपूर यांनी 'जुग जुग जियो' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने शुटिंगला सुरुवात केली. या सिनेमात त्यांच्यासोबत अनिल कपूर,वरुण धवन,कियारा अडवाणी ही तगडी स्टारकास्ट एकत्र दिसणार आहे. भारतात चंदीगढ आणि इतर अनेक ठिकाणी या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलेलं आहे. नुकतंच या सिनेमाचं शुटिंग संपलं. त्यानिमित्ताने नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर टाकलेला सेल्फी आणि पोस्ट सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांची वाहवा मिळवतेय. यामध्ये आलिया भटपासून कियारा अडवाणीपर्यंत अनेकांचा समावेश आहे. आलियाने नीतू कपूर यांच्या सेल्फी आणि पोस्टवर हार्ट इमोजी टाकत 'सो प्रिटी'(खूप सुंदर) अशी कमेंटही दिलीय.

नीतू सिंग यांनी सेटवर शेवटच्या दिवशी एक छान से्ल्फी काढून त्यावर पोस्ट लिहिलीय की,"संपलं शूटिंग एकदाचं. पण मी खूश आहे. कारण या सिनेमानं मला खूप चांगले अनुभव दिले,छान मित्र-मैत्रिणी दिले,जेव्हा खरंच आत्मविश्वासाची गरज होती तेव्हा तो मला दिला. हा सिनेमा माझ्यासाठी नेहमी स्पेशल राहील''. या सेल्फीत नीतू यांच्या हातावर छान मेहेंदी दिसतेय,त्यांनी यात ट्रेडिशनल कलरफुल ड्रेस परिधान केलाय आणि त्यासोबत आकर्षक ज्वेलरीही घातलेली आहे. आपल्या वॅनिटी व्हॅनमध्ये त्यांनी हा सेल्फी क्लिक केला आहे.

नीतू कपूर यांच्या सेल्फीवर आलियाच्या कमेंटसोबतच नीतू यांची मुलगी रिधिमा कपूरने 'मोस्ट ब्युटिफुल',कियारा अडवाणीने 'यू आर व्हेरी स्पेशल' आलियाची बहीण शाहिन भट्टनेही 'य्या...य' तर अनिल कपूर यांनी कमेंट बॉक्समध्ये भरपूर 'हार्ट इमोजी' टाकलेत. 'जुग जुग जियो' या सिनेमाचा दिग्दर्शक राज मेहता यानेही त्याच्या इन्स्टाग्रामवर नीतू सिंग यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केलीय. त्यात तो म्हणतोय,''मला आठवतंय की जेव्हा करण जोहरने मला या सिनेमातील गीताच्या भूमिकेसाठी तुमचं नाव सुचवलं होतं, तेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड होतो. आणि जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो,तेव्हाच मला कळलं होतं तुमच्यापेक्षा कोणी इतर ही भूमिका चांगली करूच शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात असलेली एनर्जी पाहून आपसूक सगळ्यांचा उत्साह वाढतो हे मी तुमचा एक फॅन म्हणून अनुभवलंय. 'जुग जुग जियो' या माझ्यासाठी अत्यंत खास असलेल्या कलाकृतीचा तुम्ही एक भाग आहात याचा मला आनंद आहे. आणि तुम्हाला मला दिग्दर्शित करण्याचं भाग्य लाभलं ही मी माझ्यासाठी एक सुवर्णसंधी समजतो''.

हेही वाचा: जेव्हा कतरिना म्हणते, 'मी सुंदर दिसत नाही!'

loading image
go to top