प्रत्येक माणूस युनिक आहे कतरिना कैफ म्हणालीEntertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कतरिना कैफ
जेव्हा कतरिना म्हणते, 'मी सुंदर दिसत नाही!'

जेव्हा कतरिना म्हणते, 'मी सुंदर दिसत नाही!'

कतरिना कैफ म्हणजे मादक सौंदर्य हे समीकरण परफेक्ट बसणारं. मोठमोठ्या मॅगझीनचं कव्हरपेज,स्टायलिश ब्रॅंड्सची ब्रॅंड अॅम्बेसिडर,बीग बजेट सिनेमांची लीड म्हणून झळकणारी कतरिना कैफ आज जगभरातल्या फॅन्सच्या ह्दयात घर करून आहे. पण याच कतरिनाला एकेकाळी वाटायचं ती नाकी-डोळी देखणी नाही. त्यावेळच्या मॅगझीनमधील मॉडेल्सचे फोटो पाहिले की तिला तिच्या दिसण्याविषयी मनात न्यूनगंड निर्माण व्हायचा. आणि मग लगेचच ती एखाद्या सौंदर्य स्पर्धेमधून माघार घ्यायची.

एका मुलाखतीत कतरीना म्हणाली,''खूप वर्षांपूर्वी मॅगझीनमधील मॉडेल्स जशा दिसतात तसंच आपण दिसायला हवं असं उगाचच मला वाटतं राहायचं आणि आपसूक त्याचं टेन्शन मला यायचं. आज मी असं म्हटल्यावर लोकांना आश्चर्य वाटेल पण खरंच त्यावेळी मी सुंदरतेच्या मापदंडात बसत नाही असं माझं ठाम मत होतं. पण आज माझ्या ब्युटी ब्रॅंडच्या कॅंपेनसाठी मी स्वतः मॉडेल्स शोधते तेव्हा त्यांच्यात उगाचच वेगळेपणा शोधत बसत नाही. सौंदर्य ही गोष्ट एकाच साच्यात बसू शकत नाही असं माझं मत आहे. प्रत्येक माणूस हा युनिक आहे. रंग,आकार,नाकी-डोळी असेच हवेत-तसेच हवेत असे मानणारी मी नाही. किंबहुना सौंदर्याची परिभाषा त्यावर मुळीच अवलंबून नाही''.

कतरिना कैफ

कतरिना कैफ

हेही वाचा: 'फेक व्ह्यूज'चा बादशाह? ७४ लाख रुपये मोजून ७२ लाख फेक व्ह्यूज

कतरिना कैफचा रोहित शेट्टी दिग्दर्शित सुर्यवंशी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. अक्षय कुमार,रणवीर सिंग,अजय देवगण अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमात कतरिना कैफसोबत आहे. या सिनेमानं आतापर्यंत 150 कोटीचा व्यवसाय केला आहे. आगामी फोन भूत या सिनेमात कतरिना सिद्दार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. तर सलमान खान आणि तिची जोडी पुन्हा टायगर 3 सिनेमात एकत्र काम करतेय. आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रासोबतच्या 'जी ले जरा' या कतरिनाच्या सिनेमाची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरू आहे.

loading image
go to top