अक्षयकुमार मध्यस्थ.. पण कोणासाठी?

टीम ई सकाळ
सोमवार, 24 जुलै 2017

आजकाल प्रत्येकाच्या तोंडी आलिया भटचे नाव आहे. दिसायला देखणी आणि अभिनयातही प्रतिभा असलेल्या या अभिनेत्रीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी प्रत्येजण उत्सुक आहे. यात जाॅली एलएलबी फेम सुभाष कपूरही अववाद नाही. अलियाला भेटण्यासाठी काहीही करण्याची तयारी कपूर यांनी दाखवली आहे. 

मुंबई : आजकाल प्रत्येकाच्या तोंडी आलिया भटचे नाव आहे. दिसायला देखणी आणि अभिनयातही प्रतिभा असलेल्या या अभिनेत्रीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी प्रत्येजण उत्सुक आहे. यात जाॅली एलएलबी फेम सुभाष कपूरही अववाद नाही. अलियाला भेटण्यासाठी काहीही करण्याची तयारी कपूर यांनी दाखवली आहे. 

सध्या आलिया चर्चेत आहे ती झोया अख्तरच्या नव्या चित्रपटामुळे. या सिनेमात तिची जोडी रणवीर सिंगसोबत जमणार आहे. त्याच्या बातम्या येत असतानाच सुभाष कपूर यांनीही सिनेमाची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यांना आपल्या सिनेमात अलियाच हवी आहे. तिच्या तारखा आणि तिला विषय समजावून सांगता यावा म्हणून ते वारंवार तिची भेट मागतायत. पण अलिया कमालीची व्यग्र असल्यामुळे ही भेट होऊ शकलेली नाही. आता सुभाष कपूर यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला असून, त्यांनी आपली मिटिंग लाव असे साकडे असे अक्षयकुमारलाच सांगितले आहे. सध्या अक्षय लंडनमध्ये असून तो लवकरच परतेल. त्यानंतर मात्र अालिया भटसोबत मिटिंग होईल अशी खात्री सुभाष कपूर यांना वाटते. 

Web Title: alia bhat meeting akshay kumar esakal news