भटक्या जनावरांसाठी अालियाचे नवे फोटोशूट

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जुलै 2017

अलिया भट नेहमीच सामाजिक भान जपत असते. यापूर्वी तिने समुद्रातील कासवांसाठी मोहीम छेडली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता तिने भटक्या मांजर आणि कुत्र्यांसाठी नवी योजना आखली आहे. 

मुंबई : अलिया भट नेहमीच सामाजिक भान जपत असते. यापूर्वी तिने समुद्रातील कासवांसाठी मोहीम छेडली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता तिने भटक्या मांजर आणि कुत्र्यांसाठी नवी योजना आखली आहे. 

आपल्याप्रमाणेच भटक्या जनावरांनाही मन असते. रस्त्यावर फिरणारे कुत्रे, मांजर वाहनाच्या धडकेत जीव गमावतात. बऱ्याचदा त्यांचा जीव भूकेनेही जातो. त्यासाठी यांना दत्तक घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अलियाने नुकतेच नवे फोटोशूट केले. या फोटोशूटची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा आहे. 

Web Title: alia bhat new photoshoot esakal news

टॅग्स