गौरी खानच्या डिझायनर स्टोअरमध्ये आलिया..

शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई : गौरी खान इंटिरिअर डिझायनर आहे. तिचं स्वत:चं दुकानही आहे. या स्टोअरमध्ये काही दिवसांपूर्वी अलिया भट गेली होती. अलिया नवं घर बघते आहे ही बातमी तर जुनी झाली. आपल्या याच घरासाठी अलियाने काही सामान तिच्याकडून खरेदी केलं. 

ही बातमी अलियानेच चाहत्यांना दिली. इन्स्टाग्रामवर ते फोटो तिने शेअर केले. तिचा अनुभव तिने व्हिडिओ स्वरुपात दिला आहेच. पण गौरी खानच्या या कामाचं तिने कौतुकही केलं आहे. गौरीनेही अलियाला धन्यवाद दिलेत. तिला हवं तसं घर लवकर मिळो असंही गौरीने लिहिलंय."

पहा आलियाचा व्हिडीओ..

अनेकांना माहित नसेल, पण गौरी खानने प्रयत्नपूर्वक आपला ब्रॅंड तयार केला आहे. शाहरूख खानशी विवाहबद्ध होण्यापूर्वीापसूनच ती इंटेरिअर डिझायनर म्हणून काम करते आहे. सुपरस्टारची पत्नी झाल्यानंतरही तिने आपली रूची जोपासली आणि इंटेरिअर डिझायनिंगमध्ये करिअर केलं. अलिया म्हणते, दरवेळी मी या स्टोअरसमोरून गेले की आपण आपलं नव घर घेतलं की इथून सामान घेऊ असं वाटत असे. आता मी काही सामान घेतलं आहे. पण मला घर मिळालं की त्याचं इंटेरिअर गौरीच करेल हे मी ठरवून टाकलं आहे. 

गौरीनेही आलियाला या कौतुकाबद्दल धन्यवाद दिलेत. 

Web Title: alia bhat visits gauri khan store mumbai esakal news