esakal | ब्रम्हास्त्रची वाट पाहतायं, यावर्षीही प्रदर्शित होणार नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir and aaliya  bhatt

ब्रम्हास्त्रची वाट पाहतायं, यावर्षीही प्रदर्शित होणार नाही...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा मोठा फटका बॉलीवूडला बसला आहे. अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. चाहत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्यांच्या चित्रपट, मालिका यांच्या रिलिज डेट जाहिर केल्या होत्या. कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात रणबीर आणि आलिया भट्टच्या (alia bhatt ) ब्रम्हास्त्रचा (brahmastra ) ही समावेश आहे. (alia bhatt and ranbir kapoor brahmastra will not be released this year )

2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची माहिती यापूर्वी निर्मात्यांनी दिली होती. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आलिया (alia bhatt) आणि रणबीरच्या (ranbir kapoor) चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे ब्रम्हास्त्रच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम अजून बाकी आहे. त्यामुळे चाहत्यांना आलिया आणि रणबीरला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा ब्रम्हास्त्र हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. सोशल मीडियावरही त्यासंबंधी चर्चा होती. त्या चित्रपटाची कथा, कलाकारांची टीम, याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही शेअर झाल्या होत्या. पिंकविलानं दिलेल्या एका रिपोर्टनुसार पुढील वर्षी 2022 मध्ये मे महिन्याच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: "त्या घटनेनंतर कॅमेऱ्याचे फ्लॅश पाहिले तरी माझं रक्त खवळतं"

हेही वाचा: 'राणी बरोबरची लव स्टोरी भारीच होती'

माध्यमांमध्ये सुरु असणा-या चर्चेनुसार 2021 च्या शेवटापर्यत कोरोनाचा कहर वाढणार असल्याची म्हटले जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव अनेकांनी रिलिज डेट पुढे ढकलल्या आहेत. वास्तविक 2018 पासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मात्र काही कारणास्तव तो प्रदर्शित होण्यास उशिर होतो आहे. आतापर्यत या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झालेला नाही.

loading image