'राणी बरोबरची लव स्टोरी भारीच होती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rani mukherjee

'राणी बरोबरची लव स्टोरी भारीच होती'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील काही लव स्टोरीज प्रसिध्द आहेत. त्यात अनेक सेलिब्रेटींची नावं सांगता येतील. सध्या राणी मुखर्जीची (Rani mukerji) चर्चा सुरु आहे. तिनं आदित्य चोप्रा (aditya chopra) यांच्याबरोबर लग्न केलं होतं. त्यापूर्वी राणीचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं होत. त्यात अभिषेक बच्चनच्या नावाचा खास उल्लेख करावा लागेल. त्यांचे लग्न होणार असंही म्हटलं गेलं. मात्र ते झालं नाही. आदित्य चोप्रा यांचा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांनी राणी बरोबरच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्या दोघांची लव स्टोरी वेगळा विषय आहे. (aditya chopra birthday special amazing love story with rani mukerji)

आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांचे 21 एप्रिल 2014 मध्ये इटलीमध्ये लग्न झालं. त्यांना आता आदिरा नावाची मुलगीही आहे. मात्र त्या दोघांचा लग्नापर्यतचा प्रवास काही सोपा नव्हता. बॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रा यांचे नाव घेता येईल. त्यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (Dilwale dulahaniya le jayenge) , मोहब्बते (Mohabbate) , रब ने बना दी जोडी (Rab ne bana de jodi) आणि बेफ्रिके सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. आदित्य यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्यावेळी आदित्य आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरच्या चर्चा झडु लागल्या त्यावेळी तिच्या फॅन्सला या गोष्टीचे आश्चर्य वाटले होते. ते दोघेही एकत्र असल्याचे फार कमी वेळा दिसून आले. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आदित्य यांना मीडियापासून लांब राहणे आवडते. आपल्या खासगी आयुष्यात माध्यमांचा शिरकाव त्यांना मान्य नाही. जेव्हा राणी हॉस्पिटलमध्ये दाखल होती तेव्हा तिची विचारपूस करण्यासाठी आदित्य जात असत. आता तर दोघांनी वेट लॉससाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

हेही वाचा: Video : पोस्टरला दुग्धाभिषेक करताना पाहून सोनू सूद म्हणाला..

हेही वाचा: महाराष्ट्रात शूटिंगला नियम, अटींसह मिळणार परवानगी

राणी नेहमी सांगते की, मी ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशी लग्न केले. याचा मला आनंद आहे. आदित्यशी लग्न होणं हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही. आदित्य यांनी यापूर्वी पायल खन्ना हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र ज्यावेळी आदित्य आणि राणी यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली तेव्हा त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुंग लागला.

loading image
go to top