esakal | कोरोनावर मात करताच रणबीर-आलिया निघाले मालदिवला
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and alia bhatt

कोरोनावर मात करताच रणबीर-आलिया निघाले मालदिवला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलियाला कोरोनाची लागण झाली होती. आता कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर दोघंही मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी निघाले आहेत. मालदिव हे सध्या बॉलिवूड कलाकारांचं सर्वांत आवडतं ठिकाण आहे. अनेक सेलिब्रिटींनी व्हेकेशनसाठी हे ठिकाण निवडलं आहे. त्यात आता रणबीर-आलियाचीही भर पडली आहे.

मालदिवसाठी रवाना होताना रणबीर आणि आलियाला मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी दोघांचे फोटो क्लिक केले आणि सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहेत. रणबीर-आलियाने यावेळी पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. रणबीर-आलियासोबतच सारा अली खान, दिशा पटानी, टायगर श्रॉफ हे सेलिब्रिटीसुद्धा मालदिवला रवाना झाले आहेत.

हेही वाचा : कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन सोनू निगमचं मोठं विधान

काही दिवसांपूर्वीच रणबीरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो घरातच क्वारंटाइनमध्ये राहत होता. त्याच्या आठवड्याभरानंतर आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली. आलियानेही स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतलं होतं. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी मालदिवला रवाना झाले आहेत.