रणवीर-आलियाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

अभिनेता रणवीर सिंग व बॉलीवूडची क्‍यूट गर्ल आलिया भट जाहिरातीत एकत्र झळकले आहेत. त्यांची केमिस्ट्री चांगली वाटते. त्यांच्या जाहिराती पाहून नेहमी चर्चा होते, की या दोघांवर चित्रपट बनायला हवा; मात्र आता ही चर्चा खरी होते आहे. फरहान अख्तरची बहीण जोया अख्तर या दोघांना घेऊन सिनेमा बनवत आहे. या चित्रपटाचे नाव आहे "गली बॉय'. सुरुवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी रणवीर कपूरच्या नावाची चर्चा होती; मग वरुण धवन असल्याचे बोलले जात होते; मात्र रणवीर सिंगला फायनल केले. रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

अभिनेता रणवीर सिंग व बॉलीवूडची क्‍यूट गर्ल आलिया भट जाहिरातीत एकत्र झळकले आहेत. त्यांची केमिस्ट्री चांगली वाटते. त्यांच्या जाहिराती पाहून नेहमी चर्चा होते, की या दोघांवर चित्रपट बनायला हवा; मात्र आता ही चर्चा खरी होते आहे. फरहान अख्तरची बहीण जोया अख्तर या दोघांना घेऊन सिनेमा बनवत आहे. या चित्रपटाचे नाव आहे "गली बॉय'. सुरुवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी रणवीर कपूरच्या नावाची चर्चा होती; मग वरुण धवन असल्याचे बोलले जात होते; मात्र रणवीर सिंगला फायनल केले. रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. हे दोघेही व्यस्त असल्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. 

Web Title: alia bhatt and ranveer singh chemistry