Alia-Ranbir: 'आलिया हे शोभलं का तुला?' सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia-Ranbir News

Alia-Ranbir: 'आलिया हे शोभलं का तुला?' सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही...

Alia - Ranbir Movie: आलिया - रणबीर हे सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहे. त्याचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. एकीकडे या चित्रपटावर बहिष्काराची मागणी होत असताना ज्यांनी (Social media viral movie) ती मागणी केली अशांना बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनं चकित केलं आहे. आलियानं देखील आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना त्या आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रला गेल्या (Bramhastra movie news) काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. दहा वर्षांपासून अयान मुखर्जी यांची मेहनत असलेल्या ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांनी पसंत केले आहे.

आता आलिया तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्याचा परिणाम असा की, तिला पुन्हा नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. रणबीर आणि आलियाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ब्रम्हास्त्रच्या निमित्तान एका पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर पापाराझ्झींनी त्याा दोघांचे फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती. त्या दरम्यान आलिया जे काही केलं ते पाहून तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. आलियानं देखील नेटकऱ्यांना ट्रोलिंगसाठी काहीही पुरतं असं म्हणून तो विषय बाजुला सोडला आहे.

कारमधून बाहेर पडल्यानंतर आलियानं रणबीरची हेअर स्टाईल ठीक कऱण्याचा प्रयत्न केला. यासगळ्यात ती फोटोग्राफर्सच्या नजरेत आली होती. अनेकांनी त्याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर पोस्टही केला. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात केली आहे. युझर्सनं त्यांना भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलिया तुला त्याची हेअर स्टाईल करायची आहे, पण त्याची इच्छा नाही. दुसऱ्यानं ब्रम्हास्त्रनंतर तुम्ही दोघेही हवेत आहात. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

एकानं लिहिलं आहे की, अरे देवा एवढा मोठा ड्रामा करण्याची काय गरज आहे. जसे की आम्हाला काहीच कळत नाही. आलिया हे जरा अतीच होतं आहे. तिसऱ्यानं आलिया हे असं करणं तुला शोभलं का, आणि पुन्हा कुणी ट्रोल की त्यांच्यावर चिडायचे. असे तू म्हणते या शब्दांत आलियाला प्रतिक्रिया दिली आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.