Watch Darlings teaser: बेडूक-विंचवाची गोष्ट सांगत आलियानं वाढवला सस्पेन्स Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Darlings teaser Release

Watch Darlings teaser: बेडूक-विंचवाची गोष्ट सांगत आलियानं वाढवला सस्पेन्स

आलिया भट्टचा(Alia Bhatt) आगामी सिनेमा 'डार्लिंग्ज'(Darlings) चा पहिला टीझर(teaser) रिलीज(Release) करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर(Netflix) प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या माध्यमातून आलिया निर्माती म्हणूनही पहिल्यांदा सर्वांसमोर येणार आहे. 'डार्लिंग्ज' सिनेमात शेफाली शहा,विजय वर्मा,रोशनी मॅथ्यू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये आलिया आणि विजय वर्माचा रोमान्स आणि दोघांनी लगेच आईचा आशीर्वाद घेऊन केलेलं लग्न हे सगळं पटापट उलगडतंय असं वाटतानाचा सस्पेन्स वाढताना दिसतो. आलिया एका बेडकाची आणि विंचवाची स्टोरी बॅकग्राऊंडला सांगताना दिसतेय,यातच सिनेमा दडलाय. टीझरच्या शेवटी आलियाचा धमाकेदार मेकओव्हर थक्क करून सोडेल एवढं मात्र नक्की.(Alia Bhatt 'Darlings' teaser Release)

टीझरचा व्हिडीओ शेअर करत आलियाने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे,''हा फक्त टीझर आहे डार्लिंग्ज,५ ऑगस्टला येतेय मी''. आता जसा सोशल मीडियावर 'डार्लिंग्ज'चा टीझर रिलीज होतोय,तसा लगोलग व्हायरल देखील झाला आहे. आलियाचे चाहत्यांच्या टीझर भलताच पसंतीस उतरत आहे. आलियानं आपल्या अभिनयानं भूमिकेला चारचॉंद लावलेयत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खूप कमी वयात तिनं एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे केले आहेत. आलिया खूपच गुणी अभिनेत्री आहे यात काहीच शंका नाही.

हेही वाचा: 'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

आलिया भट्टचा 'डार्लिंग्ज'चा टीझर पाहून सिनेमा सस्पेन्सनी भरलेला अन् थ्रील वाढवणारा असणार हे मात्र पक्कं आहे. ५ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रीलिज केला जाईल. सिनेमाला विशाल भारद्वाजने संगीत दिलं आहे आणि गुलजार यांनी सिनेमाची गाणी लिहिली आहेत. आलियाने मागे एका मुलाखतीत 'डार्लिंग्ज' विषयी आपलं मत स्पष्ट करताना लिहिलं होतं की,''हा सिनेमा तिच्या खूप जवळचा आहे. निर्माती म्हणून तिची नवी इनिंग सुरु होते आहे असं देखील ती म्हणाली होती''. आलिया लवकरच रणबीरसोबत 'ब्रह्मास्त्र' मध्ये देखील दिसणार आहे. सध्या ती आपल्या 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलीवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Web Title: Alia Bhatt Darlings Teaser

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..